Home /News /entertainment /

सलमान खानची नक्कल करुन ओढत होता संसाराचा गाढा, लॉकडाऊनमध्येही मदतीसाठी ‘भाईजान’चं धावला

सलमान खानची नक्कल करुन ओढत होता संसाराचा गाढा, लॉकडाऊनमध्येही मदतीसाठी ‘भाईजान’चं धावला

यापूर्वीही सलमान खान सिनेसृष्टीतील अनेक रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना मदत देण्यासाठी पुढे आला होता

    मुंबई, 29 एप्रिल : सध्या संपूर्ण देश कोरोनाव्हायरस (Coronavirus) नावाच्या संकटाशी झुंज देत आहे. यामुळे लोकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. दरम्यान, सर्व कामं ठप्प झाली आहे. बॉलिवूडबद्दल सांगायचं झालं तर या इंडस्ट्रीशी संबंधित जवळजवळ सर्व कामे बंद झाली आहेत. ज्यामुळे अनेक रोजंदारीवर काम करणारे मजूर अडचणीत सापडले आहेत. या उद्योगाशी संबंधित काही बॉलिवूड कलाकारांची नक्कल करणारे कलाकार (Bollywood Lookalike Artist) आर्थिकदृष्ट्या त्रस्त झाले आहेत. या संकटात रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांवर आणि कलाकारांसमोर आर्थिक संकट उभं राहिलं आहे. सलमान खान त्यांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार सलमानने स्टारच्या नक्कल करणाऱ्या कलाकारांनाही मदत केली आहे. सलमान खानने सुमारे 162 कलाकारांच्या बँक खात्यात पैसे पाठवल्याचे सांगितले जात आहे. सलमान खानने सर्व कलाकारांना 3 हजार रुपयांची मदत पाठविली आहे, अशी माहिती ऑल इंडिया लूक अ लाइक असोसिएशनने दिली आहे. त्याचवेळी शाहरुख खानची नक्कल करणारे प्रशांत वालदे यांनीही सलमानच्या मदतीवर आभार व्यक्त केले आहे. ते म्हणतात की, सध्या कोणताही चित्रपट, अ‍ॅड शूट सुरू नाहीत. अशा परिस्थितीत सर्व कलाकार बेरोजगार झाले आहेत. बर्‍याच जणांची परिस्थिती बिकट आहे. म्हणूनच असोसिएशनचे अध्यक्ष आरिफ खान आणि सहसचिवांनी मिळून एफडब्ल्यूआयसीईकडे मदत मागितली होती. त्यांनी असेही म्हटले आहे की 'आम्ही सलमानभाईचे आभार मानतो की, त्यांनी लॉकडाऊनच्या काळात आमच्याकडे लक्ष दिले. आमच्यासोबत 62 कलाकार जोडलेले आहेत आणि सर्वांना मदतीचा निधी मिळाला आहे. आमच्या सर्वांना बीइंग ह्युमन फाउंडेशन कडून 3000 रुपये मिळाले आहेत. त्यांनी सांगितले की 'आम्हाला वस्तू खरेदी करण्यासाठी 2000 रुपयांची कूपनही दिले जात आहे'. संबंधित -लॉकडाऊनमध्ये चांगली बातमी! देशातील बेरोजगारीचा दर झाला कमी, काय आहेत कारणं?
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Salman khan

    पुढील बातम्या