सलमानला मोठ्या पडद्यावर साकारायची आहे 'या' क्रूर खानाची व्यक्तिरेखा

सलमानला मोठ्या पडद्यावर साकारायची आहे 'या' क्रूर खानाची व्यक्तिरेखा

राजकीय नेते, खेळाडू, समाजसेवक तसेच अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचा ट्रेंड सध्या बॉलिवूडमध्ये सुरू आहे.

  • Share this:

मुंबई, 24 मे : बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक सिनेमांची चलती आहे. राजकीय नेते, खेळाडू, समाजसेवक तसेच अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे. याशिवाय ऐतिहासिक सिनेमांच्या निर्मितीचं प्रमाणही सध्या वाढलं आहे. यामध्ये रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, नवाझु्द्दीन सिद्दीकी, रणवीर सिंह अशा अनेक कलाकारांनी आतापर्यंत बायोपिकमध्ये काम केलं आहे. काही बायोपिक बॉक्स ऑफिसवर अक्षरशः आपटलेही. पण बॉलिवूडमध्ये बायोपिकची क्रेझ अजिबात कमी झालेली नाही. पण अद्याप बॉलिवूडचा दबंग सलमाननं मात्र आतापर्यंत एकाही बायोपिकमध्ये काम केलेलं नाही पण तो लकरच एका ऐतिहासिक बायोपिकमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

सलमानला नुकताच एका मुलाखतीत बॉलिवूडमधील वाढत्या बायोपिक ट्रेंडबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी सलमाननं एक ऐतिहासिक व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर साकारण्याची इच्छा बोलून दाखवली. सलमान म्हणाला, 'मला अद्याप कोणताही बायोपिक मिळालेला नाही मात्र अशी संधी मिळाल्यास मला मुघल साम्राज्याचा सर्वात पहिला राजा चंगेज खान याची व्यक्तिरेखा साकारायला आवडेल.' चंगेज खान हा मुघल साम्राज्याचा पहिला राजा आणि संस्थापक होता. ज्याचं साम्राज्या अवघ्या आशिया खंडात पसरलं होतं. सलमान पुढे म्हणाला, 'मला आशा आहे की बॉलिवूडमधील फिल्ममेकर या ऐतिहासिक सिनेमाबाबत विचार करतील.'
 

View this post on Instagram
 

‘Journey of a man and a nation together’ #BharatTrailer Trailer link in the Bio! @bharat_thefilm @aliabbaszafar @atulreellife #BhushanKumar @katrinakaif @tabutiful @apnabhidu @sonalikul @dishapatani @whosunilgrover @norafatehi @iaasifsheikhofficial @nikhilnamit @reellifeproduction @skfilmsofficial @tseries.official


A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सलमानचा 'भारत' सिनेमा 5 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा कोरियन सिनेमा 'ओड टू माय फादर'चा हिंदी रिमेक आहे. या सिनेमात सलमान सोबत कतरिना कैफ, दिशा पटानी, सुनील ग्रोवर, तब्बू आणि जॅकी श्रॉफ यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'भारत' दिग्दर्शन अली अब्बास जफरनं केलं आहे.

निर्माता अनुराग कश्यपच्या मुलीला सोशल मीडियावरून बलात्काराची धमकी

'...और प्यार हो गया', प्रियांकानं सांगितलं निकच्या प्रेमात पडण्यामागचं कारण

पीएम मोदींच्या विजयानंतर कंगना रनौतचं हटके सेलिब्रेशन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 02:37 PM IST

ताज्या बातम्या