Home /News /entertainment /

सलमाननं शेअर केले आयतसोबतचे खास क्षण, पाहा मामा-भाचीचा हा क्यूट VIDEO

सलमाननं शेअर केले आयतसोबतचे खास क्षण, पाहा मामा-भाचीचा हा क्यूट VIDEO

सलमान खाननं अर्पिता खानची मुलगी आयतसोबतचा हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

  मुंबई, 08 मार्च : बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या सिनेमांसोबतच त्याच्या पर्सनल लाइफमुळे सध्या चर्चेत असतो. सलमान खान सोशल मीडियावरही खूप चर्चेत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो नेहमीच चाहत्यांसाठी काही ना काही भेट देत असतो. आताही त्यानं असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो त्याची भाची आयतसोबत धम्माल करताना दिसत आहे. मामा-भाचीचा हा क्यूट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल आहे. सलमान खाननं अर्पिता खानची मुलगी आयतसोबतचा हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आतापर्यत हा व्हिडीओ 16 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान आयतसोबत खेळताना दिसत आहे आणि आयत सुद्धा तिच्या मामासोबत खूपच खुश असल्याचं पाहायला मिळत आहे. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहता तिचं आणि सलमानचं खास बॉन्डिंग असल्याचं लक्षात येतं. तसं पाहायला गेलं तर सलमान आणि त्याच्या कुटुंबातील प्रत्येक लहान मुलाचं नातं नेहमीच खास आहे. पण आयत आणि सलमान यांचं नातं त्याहून खास असल्याचं या व्हिडीओमधून लक्षात येतं. OMG! दीपिकाचा लूक पाहून चाहते घायाळ, बीचवर केलं हॉट फोटोशूट
  View this post on Instagram

  #repost @arpitakhansharma ・・・ We love you Mamu @beingsalmankhan

  A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

  सलमानची बहीण अर्पितानं डिसेंबर 2019 मध्ये मुलीला जन्म दिला होता. विशेष म्हणजे आयतचा जन्म सुद्धा सलमानच्या वाढदिवसालाच झाला. यासाठी अर्पितानं सी सेक्शनची मदत घेतली. सलमानच्या वाढदिवसाला अर्पिता-आयुषनं त्याला खास भेट दिली होती. त्यामुळे आयत आणि सलमान यांच्यात एक खास कनेक्शन आहे.
  View this post on Instagram

  Welcome to our world Ayat.

  A post shared by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on

  सलमानच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर मागील वर्षी त्याचा 'दबंग 3' रिलीज झाला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. या सिनेमात सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत दिसली होती. तर अभिनेत्री सई मांजरेकरनं या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. तिच्या अभिनयाचं कौतुक मात्र झालं. लवकरच सलमान खान 'राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रभूदेवा करत आहे. हा रणवीर आहे की कपिल देव? फोटो पाहून तुम्हीही पडाल बुचकळ्यात Yes Bank मध्ये अभिनेत्रीच्या वडिलांचे अडकले 2 कोटी, पंतप्रधानांकडे मागितली मदत
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Salman khan

  पुढील बातम्या