News18 Lokmat

Slow Motion Song- सलमान खानच्या 'भारत' सिनेमातलं पहिलं गाणं प्रदर्शित, दिशा पटानीचे स्टंट पाहाच

गाण्यातली दोघांची केमिस्ट्री लोकांना पसंत पडत आहेत. सर्कसच्या पार्श्वभूमीवर असलेल्या या गाण्यात दिशा स्टंट करताना दिसत आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2019 02:05 PM IST

Slow Motion Song- सलमान खानच्या 'भारत' सिनेमातलं पहिलं गाणं प्रदर्शित, दिशा पटानीचे स्टंट पाहाच

मुंबई, २५ एप्रिल- सलमानचा आगामी 'भारत' सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. ट्रेलरला प्रेक्षकांकडून भन्नाट प्रतिक्रिया मिळाल्यानंतर आता या सिनेमाचं ‘स्लो मोशन’ हे पहिलं गाणंही सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे. या गाण्यात सलमान आणि दिशा पाटनी थिरकताना दिसत आहेत. गाण्यातली दोघांची केमिस्ट्री लोकांना पसंत पडत आहेत. सर्कसच्या पार्श्वभूमीवर असलेल्या या गाण्यात दिशा स्टंट करताना दिसत आहे.

सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर गाणं प्रदर्शित झाल्याची माहिती देताना म्हटलं की, ‘आज डूब जाऊं तेरी आंखों के ओशियन में, स्लो मोशन में।’

‘दबंग’गिरी भोवली, सलमान खानविरोधात तक्रार दाखल

'स्लो मोशन' गाण्यात दिशा पिवळ्या साडीत फार मादक दिसतेय. तर सलमान पांढऱ्या रंगाच्या सर्कसच्या लुकमध्ये स्टायलिश दिसतोय. या गाण्याला विशाल- शेखर, श्रेया घोषाल आणि नकाशा अजीज यांनी गायलं असून इरशाद कामिलने या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

भारत सिनेमात सलमानचे अनेक रोल पाहायला मिळणार आहेत. यात सलमान १७ वर्षाच्या मुलापासून ते ७० वर्षाच्या वयोवृद्ध व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. सलमान आणि दिशाशिवाय या सिनेमात कतरिना कैफ, सुनील ग्रोवर, तब्बू आणि जॅकी श्रॉफची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यावर्षी ईदला म्हणजे ५ हा जूनला सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Loading...

अनुष्का शर्मासमोरच जेव्हा विराट कोहली मरण्याचा अभिनय करतो...दरम्यान, ३ मिनिट ११ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये सिनेमा नक्की काय असणार आहे ते स्पष्ट करण्यात आलं आहे. भारताच्या स्वातंत्र्यापासून सलमानची गोष्ट सुरू होते. सलमान सर्कसमध्ये ‘मौत का कुआ’त बाइक चालवताना दिसतो. दिशा पटानीही सर्कसमध्ये त्याच्यासोबत काम करताना दाखवण्यात आली आहे. यानंतर तो दुसरी नोकरी करण्यासाठी सरकारी कार्यालयात जातो. इथे त्याची ओळख कतरिना कैफशी होते. इथे त्याला काम मिळतं. याचदरम्यान एक अशी घटना होते ज्यात सलमान भूतकाळात जातो.

भावाच्या लग्नासाठी भारतात आले प्रियांका- निक, मंगळसूत्र फ्लाँट करताना दिसली

या फ्लॅशबॅकमध्ये जॅकी श्रॉफ दिसतो. जॅकीने सिनेमात सलमानच्या वडिलांची भूमिका केली आहे. यानंतर सलमान मर्चंट नेवीच्या ड्रेसमध्ये दिसतो. शेवटी वाघा बॉर्डवरवरचा एक सीन दाखवण्यात आला आहे. या सीनचा फोटो सलमानने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2019 01:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...