मुंबई, 15 जुलै- बॉलिवूड अभिनेता सलमान खानने नुकतंच बॉटल कॅप चॅलेंज करून त्याच्या चाहत्यांना अनोखा संदेश दिला. पण नेटकऱ्यांना या व्हिडिओमध्ये असे काही दिसले की ते आता सलमानच्या मुसलमान असण्यावरच प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. त्याचं झालं असं की, सलमानने जेव्हा हे चॅलेंज पूर्ण केलं तेव्हा त्याने सुरुवातीला हात जोडले, मग हात उंचावले त्यानंतर क्रॉस करत देवाची आठवण काढली. नेमकी हीच गोष्ट अनेकांना पटली नाही. याच कारणामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
सफी नामच्या युझरने लिहिले की, ‘सलमान तर मुसलमान आहे तर त्याने ख्रिश्चनांची विधी का केली?’ सबीना जफरने लिहिले की, ‘अरे तू तर मुसलमान आहेस, हे क्रॉस वगैरे काय करतोयस.’ अजून एका युझरने लिहिले की, ‘तू मुसलमान आहेस की ख्रिश्चन.’
सलमानच्या व्हिडिओबद्दल बोलायचे झाले तर यात सलमान बाटलीचं झाकण लाथेने उडवण्याऐवजी फुंकर मारून ते झाकण पाडताना दिसतो. तसेच या व्हिडिओला कॅप्शन देताना त्याने लिहिले की, ‘डोंट थकाओ, पानी बचाओ.’ सलमानने हा व्हिडिओ जिममध्ये शूट केला आहे.
सलमानच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर ईदच्या मुहुर्तावर त्याचा ‘भारत’ सिनेमा प्रदर्शित झाला. सध्या तो ‘दबंग 3’ सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. येत्या 20 डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणानंतर सलमान खान आणि आलिया भट्ट संजय लीला भन्साळी यांच्या ‘इन्शाअल्लाह’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
कतरिनाच्या बिकीनी फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ, Viral फोटो तुम्हीही कराल Forword
...म्हणून अक्षय कुमारचा मुलगा क्रिकेटचा द्वेष करतो
War Teaser: ज्याला आयडॉल मानलं त्याच्याच विरुद्ध उभा राहिला टायगर श्रॉफ
Bigg Boss Marathi 2- ‘शिवानीला नादीच लावतो’, घरात सुरू आहे फुल टू राडा
VIDEO: सलमान खानने केलं 'Bottle Cap Challenge'; सगळ्यांची बोलती झाली बंद!