चुकीला माफी नाही! बाप्पाची पूजा करताना सलमान चुकला, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

अर्पिता खाननं दरवर्षीप्रमाणं यावर्षीही दीड दिवसांच्या बाप्पाची प्रतिष्ठापना केली होती.

News18 Lokmat | Updated On: Sep 5, 2019 05:42 PM IST

चुकीला माफी नाही! बाप्पाची पूजा करताना सलमान चुकला, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

मुंबई, 05 सप्टेंबर : सध्या सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. कारण सर्वांच्या घरी लाडका बाप्पा आला आहे. सामान्य लोकांपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत सर्वांनी या सणाचा आनंद घेतला. नुकतंच दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन झालं. दरवर्षीप्रमाणं यावर्षीही सलमानची बहीण अर्पिता खानच्या घरी दीड दिवसांच्या बाप्पांचं आगमन झालं होतं. सलमानच्या संपूर्ण कुटुंबानं बाप्पाचं स्वागत मोठ्या थाटात केलं. तसेच विसर्जनाच्या वेळी सलमाननं केलेला गणपती डान्स सगळीकडे खूप व्हायरलही झाला. मात्र बाप्पाच्या पूजेदरम्यान भाईजानकडून एक छोटीशी चूक झाली आणि त्याला काही लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली.

अर्पिता खाननं दरवर्षीप्रमाणं यावर्षीही दीड दिवसांच्या बाप्पाची प्रतिष्ठापना केली होती. बाप्पांच्या विसर्जनाच्या अगोदर आरती करतेवेळी सलमाननं भाचा अहिलला कडेवर उचलून घेतलं होतं आणि त्यानं आरतीची ताट हातात घेतलं मात्र अहिल कडेवर असल्यानं गोंधळलेल्या सलमाननं चुकून हे ताट उलट्या दिशेनं फिरवलं. या आरतीचा व्हिडीओ जेव्हा सोशल मीडियार व्हायरल झाला त्यावेळी त्याची हीच चूक नेमकी युजर्सच्या लक्षात आली आणि त्यावरून त्याला ट्रोल करायला सुरुवात झाली. सलमानला ट्रोल करणारे सर्व युजर्स हे पाकिस्तानी आहेत असं म्हटलं जात आहे.

Throw back या फोटोतली अभिनेत्री तुम्हाला तरी ओळखता येईल का? आता आहे एकदम slim

Loading...

 

View this post on Instagram

 

#salmankhan with little #ahil today #ganpatiarti at #arpitakhansharma home #viralbayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

बॉलिवूड फोटोग्राफर विरल भयानी यांनी अर्पिता खानच्या खरच्या गणपतीच्या विसर्जनापूर्वीच्या आरतीचा हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यावर कमेंट करताना एका युजरनं लिहिलं, ‘शेवटी तो मुस्लीम आहे.’ तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘हा काय करत आहे. एक मुस्लीम व्यक्ती हे असं कसं वागू शकते.’ तर आणखी एकानं लिहिलं, ‘सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी मी खूपच निराश आहे.’ एकीकडे हे लोक सलमानला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याच्या चाहत्यांनी मात्र या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. सलमानवर अशाप्रकरच्या कमेंट करणारे हे सर्व लोक पाकिस्तीनी असल्याचा दावा सलमानच्या चाहत्यांनी केला आहे.

गणपतीसमोरच्या या फोटोमुळे अजूनही ट्रोल होतेय सारा अली खान

रिया नावाच्या एका चाहतीनं लिहिलं, मला समजत नाही या पाकिस्तानी लोकांची नक्की समस्या तरी काय आहे. भारतीयांनी काहीही केलं तरी त्यावर कमेंट करण्याची या लोकांना सवयचं पडून गेली आहे. प्रिय पाकिस्तानी लोकांनो, तुम्ही तुमच्या कामाशी संबंध ठेवा आणि दुसऱ्यांच्या कामात नाक खुपसणं कमी करा.

आलिया भट आणि रणबीर कपूरचं लग्न? VIRAL PHOTOचं हे आहे सत्य

==========================================================

VIDEO : दुकानाबाहेर साड्या पाहत होत्या महिला, बैलाने मागून येऊन दिली धडक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2019 09:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...