Home /News /entertainment /

‘हा तर 53 वर्षांचा फ्लॅश’; Radhe मधील एण्ट्री पाहून उडवली जातेय सलमानची खिल्ली

‘हा तर 53 वर्षांचा फ्लॅश’; Radhe मधील एण्ट्री पाहून उडवली जातेय सलमानची खिल्ली

सलमान खानची एण्ट्री पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; होतेच चक्क सुपरहिरो फ्लॅशशी तुलना

    मुंबई 13 मे: सलमान खानचा (Salman Khan) मोस्ट वॉन्टेड चित्रपट राधे अखेर प्रदर्शित झाला आहे. (Radhe - Your Most Wanted Bhai) हा चित्रपट पाहून चाहत्यांनी भाईजानवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर दुसरीकडे टीकाकारांनी मात्र त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. खरं तर चित्रपटात होणारी सलमानची एण्ट्री हा त्याच्या चाहत्यांसाठी कायमच कौतुकाचा विषय असतो. (Salman Khan troll) मात्र यावेळी टीकाकारांनी एण्ट्रीचंच निमित्त साधून सलमानवर मिम्स शेअर केले आहेत. व्हायरल होणारे हे मिम्स पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. कुठे आणि कसा पाहता येईल राधे युअर मोस्ट वॉन्डेड भाई? राधे हा ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सिनेमागृह या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला आहे. ज्या ठिकाणी लॉकडाउन नाही त्या ठिकाणी हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहता येईल. मात्र उर्वरीत चाहत्यांना ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घ्यावा लागत आहे. राधेचं Zee5 या अ‍ॅपवर दुपारी 12 वाजल्यापासून स्ट्रीमिंग सुरु झालं आहे. परंतू चित्रपट पाहण्यासाठी यूजरला Zeeplex या ऑप्शनवर जावं लागणार लागेल, या ठिकाणी एक ठराविक चार्जेस भरुन चित्रपटाचा आनंद घेता येईल. दिलेल्या माहितीनुसार ही किंमत 499 इतकी ठेवण्यात आली आहे. ट्रान्सेक्शन झाल्यानंतरच तुम्हाला हा चित्रपट पाहता येईल. ‘राधे’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने U/A सर्टिफिकेट दिलंय. म्हणजेच हा चित्रपट प्रेक्षक त्यांच्या कुटूंबासोबत पाहू शकतील. 57 मिनिटांचा हा चित्रपट आहे, अशी चर्चा आहे.. ‘दबंग’ अभिनेता सलमान खानचा ‘राधे’ हा आतापर्यंचा सगळ्यात लहान चित्रपट ठरला आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Entertainment, Photo viral, Salman khan

    पुढील बातम्या