याची पावती फाडा रे!, सलमान खानचा 'हा' VIDEO पाहून नेटीझन्सची सटकली

याची पावती फाडा रे!, सलमान खानचा 'हा' VIDEO पाहून नेटीझन्सची सटकली

एकीकडे नव्या वाहतुकीच्या नियमांमुळे लोकांच्या नाकी नऊ आलेत तर दुसरीकडे सलमानच्या या व्हिडीओनंतर त्याच्याकडून वाहतूक नियमानुसार दंड वसूल करावा अशी मागणी केली जात आहे.

  • Share this:

मुंबई, 07 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं काहीही केलं तरीही ते सोशल मीडियावर व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. नुकताच सलमाननं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. ज्यावर सध्या खूप विचित्र कमेंट पाहायला मिळत आहेत. सध्या देशभरात वाहतूक नियम सक्तीचे केल्यानं पोलीस हे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. एकीकडे नव्या वाहतुकीच्या नियमांमुळे लोकांच्या नाकी नऊ आलेत तर दुसरीकडे सलमानच्या या व्हिडीओनंतर त्यांच्याकडून वाहतूक नियमानुसार दंड वसूल करावा असं बोललं जात आहे. इतकंच नाही एका युजरनं कमेंटमध्ये मुंबई पोलिसांनाही टॅग केलं आहे.

सलमाननं त्याच्या इन्स्टाग्रम अकाउटंवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो मुंबईच्या रस्त्यावर सायकल चालवताना दिसत आहे. या दरम्यान सलमान सिग्नलवर थांबलेला दिसतो. तसेच वाहतुकीचे सर्व नियम पाळताना दिसतो. मात्र त्याचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना मात्र आवडलेला दिसत नाही. हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी सलमाननं हेल्मेट न घातल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. मग काय नेटीझन्सनी सलमानला या व्हिडीओवरुन ट्रोल करायला सुरुवात केली.

प्रेग्नन्सीनंतर सोशल मीडियावरील 'बोल्ड' फोटोमुळे लिसा हेडन चर्चेत

 

View this post on Instagram

 

Mumbai city in d rains . . Off to the location to shoot for #dabangg3

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

एका युजरनं लिहिलं, ‘कोणतरी याच्याकडून दंड वसूल करावा.’ तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘सलमानचं लायसन रद्द करण्यात आलं वाटतंपण तरीही दंड हा भरावाच लागणार आहे.’ तर आणखी एका युजरनं आपल्या कमेंटमध्ये मुंबई, पोलिसांना टॅग करत लिहिलं, ‘तुमचं हेल्मेट कुठे आहे सर? मुंबई पोलिस कृपया हे प्रकरण पाहावे. हे आम्हाला प्रेरित करतात.’ तर एका युजरनं, ‘तु तर दंडापासून वाचलास.’ त्यामुळे आता मुंबई पोलिस यावर काय प्रतिक्रिया देतात याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

दबंग सलमानसोबतच्या नात्याबाबत कतरिना म्हणाली,जेव्हा मी संकटात असते...

सलमानच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायच तर तो सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘दबंग 3’ शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमा अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोबतच अभिनेता महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर सुद्धा सलमान सोबत स्क्रिन शेअर करणार आहे. काही दिवासांपूर्वी या सिनेमातील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर सलमाननं सेटवर मोबाइल वापरण्यासाठी बंदी घातली. सलमानच्या या सिनेमाचं दिग्दर्शन प्रभु देवानं केलं आहे.

जेव्हा न्यूड सीनमुळे राधिका आपटेचं बॉलिवूड करिअर आलं होतं धोक्यात...

======================================================

भरलेलं सिलेंडर घेऊन विद्युतचं खतरनाक वर्कआऊट, पाहा हा VIDEO

Published by: Megha Jethe
First published: September 7, 2019, 1:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading