S M L

ट्विटरवर सलमान झाला ट्रोल, युजर्स म्हणतात, झोपला होतास का?

कधी हरणाची शिकार असते, कधी उगाचंच केलेलं काही स्टेटमेंट असतं, सलमान खान नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकत असतो. आताही त्यानं एक ट्विट केलं आणि तो ट्रोल झाला.

Updated On: Aug 22, 2018 11:13 AM IST

ट्विटरवर सलमान झाला ट्रोल, युजर्स म्हणतात, झोपला होतास का?

मुंबई, 22 आॅगस्ट : बाॅलिवूडचे भाईजान सलमान खान भारत सिनेमाच्या शूटमध्ये बिझी आहे.  माल्टाला शूट सुरू आहे. पण सल्लूमियाँ मध्येच असं काही तरी करतो आणि लोकांच्या टीकेला पात्र होतो. कधी हरणाची शिकार असते, कधी उगाचंच केलेलं काही स्टेटमेंट असतं, सलमान खान नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकत असतो. आताही त्यानं एक ट्विट केलं आणि तो ट्रोल झाला.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या पाच दिवसानंतर सलमानला जाग आली आणि त्याने शोक व्यक्त केला. यानंतर नेटकऱ्यांनी सलमानची चांगलीचं मजा घेतली. काल मंगळवारी सलमानने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर अटलबिहारी वाजपेयींच्या निधनावर दु:ख व्यक्त करणारे ट्विट केले. ‘एक दिग्गज राजकीय नेते, एक प्रभावी वक्ते आणि एक असामान्य व्यक्तिमत्त्व अटलजींच्या निधनामुळे दु:खी आहे, ’ असे ट्विट त्याने केले. त्याच्या या ट्विटनंतर अनेक युजर्सनी सलमानला नाही, नाही ते सुनावले.

Loading...

सलमानला युजर्सनी नशा केली होतीस का, टायगर सो रहा था, कुठलं वर्तमानपत्र येतं अशा प्रकारचे अनेक ट्विट्स केले. या ट्विटमध्ये सलमान खाननं feelingचं स्पेलिंग feeing केलंय. त्यावरही  सर,feeing नाही  feeling, याकडे एका युजरने भाईचे लक्ष वेधले. या प्रतिक्रियांनी लोकांचे चांगलेच मनोरंजन केले. सलमानची यावरची प्रतिक्रिया मात्र अद्याप कळली नाही.

सलमान खानच्या 'भारत'चं शूटिंग सुरू झालंय आणि सिनेमातला सलमानचा लूकही समोर आलाय. प्रियांका चोप्राच्या जागी आता कतरिना सिनेमात काम करतेय. भारत सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलंय. सलमान खान या सिनेमात 5 लूकमध्ये दिसणार आहे. वय वर्ष 25 ते वय वर्ष 65पर्यंतचा त्याचा प्रवास या सिनेमात आहे.

लहान मुलांच्या योग्य व्यायामासाठी हा व्हिडिओ एकदा पाहाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 22, 2018 11:13 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close