फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने वर्कर्सचे प्रेसिडेंट बी एन तिवारी यांनी सलमानच्या या मदतीची माहिती दिली. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना ते म्हणाले, “सलमान अगदी सुरुवातीपासूनच म्हणजेच (corona) कोरोनाची नुकतीच सुरुवात झाली होती तेव्हा पासून आमची मदत करत आहे. या आधीही त्याने सहकार्य केलं होतं.”View this post on Instagram
‘दोन्ही डोस घेतले आता मास्क लावणार नाही’; अनुपम खेर यांचा अजब निर्णय
पुढे ते म्हणाले, “सलमान खान बॉलीवूड इंडस्ट्रीचा मोठ्या मनाचा स्टार आहे,जो नेहमी लोकांची मदत करण्यसाठी पुढे येतो. जेव्हा कोणालाही गरज असते तो सर्वात आधी मदत करतो.”सलमानने काही महिन्यांपूर्वी गरजूंना जेवण वाटप केलं होतं तर ऑक्सिजनची गरज असणाऱ्यांना मोफत ऑक्सिजन कॉन्स्ंट्रेटर्स वाटले होते. सलमानच्या चाहत्यांनी त्याच्या या कामाचं कौतुकही केलं आहे. अभिनेता सोनू सूदही (Sonu Sood) मागील वर्षभरापासून लोकांची मदत करत आहे. तर अजूनही त्याचं मदतकार्य सुरूचं आहे. निरनिराळ्या प्रकारे तो लोकांची मदत करत आहे. कोणाला शैक्षणिक तर कोणाला आर्थिक तर कोणाला वैद्यकीय मदत तो सातत्याने करत आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Salman khan