• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'आम्ही अजून लग्न नाही केलं...' म्हणत सलमानने केला आपल्या Longest रिलेशनशिपचा केला खुलासा

'आम्ही अजून लग्न नाही केलं...' म्हणत सलमानने केला आपल्या Longest रिलेशनशिपचा केला खुलासा

सलमानने (Salman Khan) एका अशा रिलेशनशिपचा खुलासा केला आहे, ज्याबद्दल कोणालाच माहिती नव्हतं.

 • Share this:
  मुंबई, 24सप्टेंबर- अभिनेता सलमान खानच्या(Salman Khan) लव्हलाईफ आणि रिलेशनशिपबद्दल (Relationship) जाणून घेण्यात चाहत्यांना फारच रस असतो. सलमान खानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. मात्र अद्यापही सलमानने लग्न केलेलं नाहीय. त्याला प्रत्येक कार्यक्रमात त्याच्या लग्नाबद्दल आणि रिलेशनशिपबद्दल विचारलं जात. असंच काहीसं झालंय बिग बॉसच्या (Bigg Boss 15) प्रेस मिटिंगमध्ये. यावेळी सलमान खानने आपल्या सर्वात जास्त चाललेल्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केला आहे. सलमान खानच्या लव्हस्टोरी जगजाहीर आहेत. सर्वांना त्याच्या अफेयर्सबद्दल माहिती आहे. मात्र सलमानने एका अशा रिलेशनशिपचा खुलासा केला आहे, ज्याबद्दल कोणालाच माहिती नव्हतं. सलमान खान लवकरच बहुचर्चित बिग बॉस शोमध्ये झळकणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा अनेक धमक्यांसह सलमान खान बिग बॉस १५चा सीजन घेऊन येणार आहे. यानिमित्ताने मध्यप्रदेशमध्ये एक प्रेस मिटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना सलमानने आपल्या या रिलेशनशिप चा खुलासा केला आहे. (हे वाचा:Bigg Boss 15: सलमान खानच्या शोमध्ये या 5 नावांची एन्ट्री झाली कन्फर्म; पाहा LIST) यावेळी बोलताना सलमान खान म्हणाला, 'बिग बॉस हे माझं एकमेव असं रिलेशनशिप आहे जे खूप काळ टिकून आहे. बाकी नाती सोडून द्या. मात्र बिग बॉस असं रिलेशनशिप आहे जे माझ्या लाईफमध्ये पर्मनन्ट आहे. तसेच सलमान म्हणाला बिग बॉस आणि माझ्यामध्ये एक समानतासुद्धा आहे की आम्ही दोघांनीही अजून लग्न केलेलं नाही. (हे वाचा:Bigg Boss15: 'उतरन' फेम टीना दत्ताची बिग बॉसमध्ये होणार एन्ट्री!अभिनेत्रीच्या...) तसेच 'बिग बॉस १५' मध्ये नवनवीन तडका लावण्यात येणार आहे. यावेळी घरामध्ये दाखल होण्यासाठी स्पर्धकांना जंगल पार करावं लागणार आहे. म्हणजेच यावेळी जंगल थीम ठेवण्यात आली आहे. काही दिवसांपासून या शोचे प्रोमो समोर येत आहेत. यामध्ये सलमान खानने हा सीजन स्पर्धकांसाठी कठीण असणार असल्याचं म्हटलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: