मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Salman Khan: मोठी बातमी! सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Salman Khan: मोठी बातमी! सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सलमान खान

सलमान खान

सलमानला जीवे मारण्याची धमकी देणार्‍या मेलने अभिनेत्याच्या कुटुंबाची तसेच मुंबई पोलिसांची झोप उडवली होती. त्यानंतर आता याच प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26 मार्च :  गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सलमान खान वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. सलमान खानचा जीव सध्या धोक्यात आहे. त्याला पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. अलीकडेच सलमान खानच्या टीमला धमकीचा ईमेल आला होता, ज्यात त्याला बिश्नोई गॅंगकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. सलमानला जीवे मारण्याची धमकी देणार्‍या मेलने अभिनेत्याच्या कुटुंबाची तसेच मुंबई पोलिसांची झोप उडवली होती. त्यानंतर  आता याच प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे.

सलमानला धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी जोधपूर येथून आरोपी धाकड राम बिश्नोईला  अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी धाकडवर कारवाई केली आहे. त्याने सलमानला ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली होती. सलमानने मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला होता. आता 21 वर्षीय धाकड राम बिश्नोईला पोलिसांनी मुंबईत आणले आहे.

VIDEO: 'मैं घर का रहा ना घाट का...' बॉलिवूड सोडून राजकारणात एंट्री करणाऱ्या अभिनेत्यानं मांडली व्यथा

काळवीट मारल्याबद्दल सलमान खान यां अभिनेत्याविरुद्ध बिश्नोई समाजाच्या संतापाशी संबंधित प्रकरण असावे, असा पोलिसांचा प्रार्थमिक अंदाज आहे. पण यासाठी सलमानला आधीच 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याआधी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये याच कारणासाठी सलमानला जीवे मारण्याची धमकी देताना दिसला होता. पण आता या तरुणाला अटक झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

केवळ सलमान खानला धमकीच नाही तर धाकड राम बिश्नोईवर पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या  वडिलांना धमकावल्याचाही आरोप आहे.

सलमानला धमक्या मिळत असल्याने पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत आणखी वाढ केली आहे. सलमानला जीवे मारण्याची धमकी देणार्‍या मेलने अभिनेत्याच्या कुटुंबाची झोप उडवली होती. सगळेच सलमानसाठी खूप चिंतेत होते. अभिनेत्याचे चाहते देखील सध्या काळजीत होते. या तरुणाला अटक झाल्याने सलमानच्या कुटुंब, मित्र परिवार आणि चाहत्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

अलीकडेच बिश्नोई यांनी एक मुलाखत दिली होती, ज्यात त्याने सलमानला काळवीट मारल्याबद्दल माफी मागावी अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा, असे सांगितले होते. 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि सैफ अली खान यांच्यावर काळवीटाची शिकार केल्याचा आरोप असल्याची माहिती आहे. तर या सगळ्या प्रकरणावर उत्तर देत 'जे जेव्हा व्हायचं तेव्हा होईल, अशा धमक्यांना घाबरत नाही.' असं सलमान म्हणाला होता

First published:
top videos

    Tags: Salman khan