मुंबई, 12 फेब्रुवारी: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (salman khan) आपल्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. सध्या तो काळवीट हत्या प्रकरणामुळे त्रस्त आहे. (blackbuck killing) सलमानने नुकतीच या प्रकरणी खोटं शपथपत्र (false affidavit) दाखल केल्याबाबत माफी मागितली. माफी मागताच अनेकांनी सलमानवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली. काही जणांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं. परंतु या सर्व प्रकरणात भाईजानचे चाहते मात्र त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे असल्याचं दिसून आलं. चाहत्यांनी तितक्याच ताकदीनं टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं. चाहत्यांचं हे प्रेम पाहून सलमान देखील भावून झाला अन् त्याने सर्वांचे आभार मानले.
"पाठिंबा देणाऱ्या सर्व चाहत्यांचे मनापासून आभार. तुमच्यामुळेच मला या प्रतिकूल परिस्थितीत लढण्याची प्रेरणा मिळाली. मित्रांनो तंदुरुस्त राहा, अन् स्वत:च्या कुटुंबीयांना देखील स्वस्थ ठेवा. ईश्वर कायम तुमच्यासोबत आहे." अशा आशयाचं ट्विट करून सलमाननं चाहत्यांचे आभार मानले.
To all my fans.. thank u for your love support n concern. Khayal rakho apna n parivaar ka. God bless n loveee u tooo... pic.twitter.com/8zPGfQx5Lk
— Salman Khan (@BeingSalmanKhan) February 11, 2021
त्याचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत लाखो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हे वाचा - सलमान आणि कॅटरिनासाठी इमरान हाश्मी झाला खलनायक, वाचा काय आहे कारण
‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान, सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे राजस्थानला गेले होते. चित्रीकरणादरम्यान जोधपूरनजीकच्या कनकनी खेड्यातील भगोडा की धानी येथे 1-2 ऑक्टोबर 1998 च्या मध्यरात्री दोन काळवीटांची शिकार केल्याचा सलमान खानवर आरोप आहे. शिकारीच्या वेळी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे तिथे उपस्थित होते.
हे वाचा - सस
CORRECTION: Blackbuck poaching case: Jodhpur District and Sessions Court in Rajasthan dismisses the plea of the State* Government, it was alleged that Salman Khan had presented false affidavit in connection with Arms Act. Govt's plea was earlier dismissed by the lower court. pic.twitter.com/bFdZ4ONhHN
— ANI (@ANI) February 11, 2021
या केसची सुनावणी मागच्या दोन दशकांपासून सुरू आहे. आता हे प्रकरण अंतिम टप्प्यात आलं आहे. Times Of India नं दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खानचे वकील हस्तीमल सारस्वत (Advocate Hastimal Sarswat) यांनी म्हटलं आहे, की 8 ऑगस्ट 2003 मध्ये न्यायालयात चुकून खोटं शपथपत्र दिलं गेलं होतं. याशिवाय सलमान बिझी असल्यानं त्यांचं लायसन्स (license) रिन्यू व्हायला गेलं आहे हे विसरला होता. आणि त्यानं कोर्टात म्हटलं होतं, की त्याचं लायसन्स सापडत नाही.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Blackbuck killing case, Consolation, Daily news, Entertainment, Salman khan, Star celebraties