मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सारेगमप स्पर्धकाची ती गोष्ट पाहून सलमान खान म्हणाला, तू एक विचित्र प्रकारचा माणूस...Video Viral

सारेगमप स्पर्धकाची ती गोष्ट पाहून सलमान खान म्हणाला, तू एक विचित्र प्रकारचा माणूस...Video Viral

 सलमान खानचा( salman khan) 'अंतिम' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान खान सारेगमपा शोमध्ये आला होता.

सलमान खानचा( salman khan) 'अंतिम' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान खान सारेगमपा शोमध्ये आला होता.

सलमान खानचा( salman khan) 'अंतिम' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान खान सारेगमपा शोमध्ये आला होता.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 28 नोव्हेंबर - सलमान खानचा( salman khan) 'अंतिम' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान खान सारेगमपा शोमध्ये आला होता. हा शो शनिवार-रविवारी प्रसारित होणार आहे. या शोचा फनी प्रोमो विशाल ददलानीने शेअर केला आहे. या टीझरमध्ये सलमान खान एका स्पर्धकाला विचित्र प्रकारचा *** माणूस म्हणताना दिसत आहे. हा प्रोमो व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे. तसेच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहे.

या शोमध्ये सलमान खानने गाणे गायले होते

हा टीझर शेअर करत विशाल ददलानीने लिहिले आहे की, तू विचित्र प्रकारचा आहेस... काय..??? असं फक्त सलमान खानच बोलू शकतो. प्रोमोमध्ये सलमान खान स्वॅगसह शोमध्ये एंट्री घेताना दिसतो आहे. यानंतर तो स्पर्धकांसोबत 'मैने प्यार किया' चित्रपटातील 'आया मौसम दोस्ती का' हे गाणे गाताना दिसत आहे.

वाचा : म्हशी पेक्षा शिंगं जड; सोनू सूद देणार गरजू कुटुंबाला म्हैस, मात्र घातलीय ही अट

गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर बनवला टॅटू

शोमध्ये स्पर्धक दीपायन बॅनर्जी सलमान खानला त्याच्या हातावरचा टॅटू दाखवतो. दीपायन सांगतो की, गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअपनंतर त्याने हा टॅटू त्याच्या हातावर गोंदून घेतला आहे. यावर सलमानने विचारले की, किती वर्षे झाली. तर दीपायन म्हणतो की, याला आठ ते नऊ वर्षे झाली आहेत . यावर सलमान खान म्हणतो, तू एक विचित्र प्रकारची व्यक्ती आहेस... (त्याचा आवाज मध्येच कापला जातो) सलमानच्या तोंडून हे ऐकून तिथे उपस्थित सर्व लोक हसू लागले.

View this post on Instagram

A post shared by VISHAL (@vishaldadlani)

आयुषला सलमानला निराश करायचे नाही

शोमध्ये सलमानसोबत अंतिम सिनेमातील अभिनेता आयुष शर्मा आणि महिमा मकवानाही आले होते. आयुष शर्माने हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना या चित्रपटाबद्दल सांगितले होते की, खूप दबाव आणि जबाबदारी आहे. मला आशा आहे की तो सलमान खानला निराश होणार नाही. लोकांना वाटते की ही घरची बाब आहे, परंतु या सर्व गोष्टींचा सामना करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कठोर परिश्रम करणे.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Salman khan