VIDEO : 'चलती है क्या 9 से 12' वर सलमान जॅकलिनला डान्स स्टेप शिकवतो तेव्हा...

VIDEO : 'चलती है क्या 9 से 12' वर सलमान जॅकलिनला डान्स स्टेप शिकवतो तेव्हा...

सलमानचा खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात तो जॅकलिन फर्नांडिसला डान्स स्टेप शिकवताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 24 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे सध्या सर्वच बॉलिवूड सेलिब्रेटी आपापल्या घरी राहून लॉकडाऊन पाळताना दिसत आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांना सुद्धा घरी राहण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या पनवेलमधील घरी अडकला आहे. दरम्यान तो सुद्धा सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वीच सलमाननं स्वतःचं युट्यूब चॅनेल सुरू केलं आणि त्यावर कोरोनाविषयी  जागरुकता निर्माण करणारं गाणं प्यार करोना रिलीज केलं. पण अशात सलमानचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात तो जॅकलिन फर्नांडिसला डान्स स्टेप शिकवताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला सलमानचा हा व्हिडीओ जुना आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान त्याचं सुपरहिट 'चलती है क्या 9 से 12' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये खास हे आहे की, सलमान जॅकलिनला या गाण्यावर डान्स शिकवत आहे. जॅकलिन सुद्धा सलमानकडून हा डान्स शिकण्याचा प्रयत्न करत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ वरुण धवनच्या जुडवा 2 सिनेमाच्या वेळचा आहे. या सिनेमात जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. सध्या सलमान आणि जॅकलिनचा हा व्हिडीओ पाहून सर्वच त्यांचं कौतुक करताना दिसत आहेत.

हे वाचा : 'फक्त यासाठी करिश्माने माझ्याशी लग्न केलं' - संजय कपूरचा धक्कादायक आरोप

सलमान खानच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तो लवकरच 'राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खरं तर हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार होता. मात्र कोरोना व्हायरसमुळे या सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. ज्यामुळे आता या सिनेमाची तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. यासिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी आणि रणदीप हुड्डा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

हे वाचा : रजनीकांतच्या चाहत्याने विजयच्या फॅनला कायमचं संपवलं; Corona वरून सुरू झाला वाद

संपादन - मेघा जेठे

First published: April 25, 2020, 8:34 AM IST

ताज्या बातम्या