...म्हणून सलमान खानने स्वतःला मारून घेतले चाबकाचे फटके, पाहा VIDEO

...म्हणून सलमान खानने स्वतःला मारून घेतले चाबकाचे फटके, पाहा VIDEO

सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका निभावणारा सलमान त्याच्या रिअल लाइफमध्ये एक फॅमिली बॉय आणि खूप इमोशनल आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑगस्ट : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘दबंग 3’च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. या सिनेमाचं काही भागांचं शूटिंग पूर्ण झालं असून उर्वरित शूटिंग सध्या सुरू आहे. सलमान खान जेव्हा सिनेमामध्ये जेव्हा शर्ट काढतो त्यावेळी अख्खं थिएटर शिट्ट्याच्या आवाजानं घुमतं. दबंगमध्ये सलमानचे अनेक स्टंट सीन आहेत आणि त्यातील अधिकाधिक सीन्स तर त्यानं स्वतःच केले आहेत. सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका निभावणारा सलमान त्याच्या रिअल लाइफमध्ये एक फॅमिली बॉय आणि खूप इमोशनल आहे. नुकताच त्यानं त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जो खूप व्हायरल होत आहे.

सलमाननं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये पोजराज समाजातील लोकांशी बोलताना दिसत आहे. सलमान अगोदर त्यांना चाबकाने स्वतःला फटके मारुन घेताना पाहतो. आणि नंतर त्यांच्याकडून तो चाबूक घेऊन स्वतः सुद्धा तसंच करतो. त्यानंतर सलमान विचारतो, याच्यातून आवाज कसा येतो. त्यानंतर पोतराज समाजातील एक व्यक्ती त्याला सांगते की त्या चाबकाच्या टोकाला जी वस्तू बांधलेली असते त्यामुळे हा आवाज येतो. हे सर्व समजून घेऊन सलमान पुन्हा एकदा प्रयत्न करतो.

सलमान खाननं खरंच रानू मंडल यांना दिलं 55 लाखांचं घर? वाचा काय आहे सत्य

 

View this post on Instagram

 

Thr is pleasure in feeling n sharing thr pain ahhhhhhhhhhhh Baccha party don't try this on your self or on any 1 else

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

यावेळी सलमान थोडं आणखी जोरात स्वतःला चाबकाचे फटके मारताना दिसतो. तो जोरजोरात स्वतःला चाबकाचे फटके मारुन घेतो. जसे पोतराज स्वतःला फटके मारुन घेतात. सलमाननं अशाप्रकारे स्वतःला फटके मारुन घेतल्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवल्या. त्यानंतर सलमान खान पोतराज समाजातील लोकांसोबत फोटो काढतो.

दीपिका पदुकोण देणार गुड न्यूज! या VIRAL VIDEO मुळे रंगतेय लागली चर्चा

सलमाननं त्याच्या इन्स्टाग्रामवर लिहिलं, ‘त्यांचं दुःख आणि वेदना यांचा जाणीव करुन घेणं हा एक वेगळा अनुभव आहे. मात्र लहान मुलांनी हे ट्राय करू नये.’ सलमानच्या या व्हिडीओला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. 1 तासात जवळपास 7 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

रानू मंडल झाल्या फेमस, मुलगी मात्र नेटिझन्सच्या निशाण्यावर, म्हणाले...

=============================================================

VIDEO: गणेशोत्सवाच्या 'या' दिवसांत रात्री 12 पर्यंत स्पीकर्सना परवानगी इतर टॉप 18 बातम्या

Published by: Megha Jethe
First published: August 31, 2019, 6:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading