मुंबई, 13 नोव्हेंबर : अभिनेता सलमान खानचा दबंग 3 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सलमान खान पुन्हा एकदा चुलबुल पांडेच्या धमाकेदार अवतारात दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला दिसला. वयाच्या 53 व्या वर्षीही चाहत्यांमधील सलमानची क्रेझ कायम असल्याचं यावरून दिसून आलं. सलमानला अनेकजण स्टाईल आयकॉन मानतात. खरं तर बॉलिवूडमध्ये असा एकही कलाकार नाही जो एकदा वापरलेले कपडे पुन्हा घालतो. पण सलमान याला अपवाद आहे. पण तरीही तो तरूणाईसाठी स्टाइल आयकॉन आहे. सलमान अनेकदा एकदा वापरलेला टी शर्ट पुन्हा घालतो. त्यानं काय घातलं आहे याचा त्याला काहीही फरक पडत नाही असं सलमान सांगतो.
सलमान अनेकदा ब्लॅक कलरच्या कपड्यांमध्ये दिसते. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं त्याच्या स्टायलिंग सेन्सवरही गप्पा मारल्या. सलमान म्हणाला, 'मी अनेक आर्टिकल पाहिलेत ज्यामध्ये महिलांच्या ड्रेसवर सर्कल करून असं सांगितलं जातं की हिने या कार्यक्रमात हे कपडे घातले होते आणि आता हुबेहूब तसाच ड्रेस या कार्यक्रमात घातला आहे.'
Bigg Boss 13: सलमानच्या समोर हिमांशी खुरानानं स्वतःला म्हटलं ऐश्वर्या राय आणि...
सलमान पुढे म्हणाला, 'जर हे असं ते माझ्यासोबत करू लागले तर हे त्यांना सगळीकडेच करावं लागेल. कारण मी आजही ते शूज वापरतो. जे मी 5 वर्षांपूर्वी घातले होते. त्याच काळ्या टी शर्ट आणि जीन्समध्ये तुम्ही अनेक वर्ष पाहू शकता. माझं एक शर्ट 500 रुपयांचं असतं आणि ते मी अनेक वर्ष वापरतो. यात चुकीच काहीही नाही. माझे बेल्ट सुद्धा 20 वर्ष जुने आहेत. कतरिना काही वर्षांपूर्वी दिलेला बेल्ट मी आजही वापरतो.'
सिनेमाच्या सेटवर प्रँक करण्यासाठी प्रसिद्ध आहेत 'हे' बॉलिवूड कलाकार!
‘दबंग 3’मध्ये सलमान खान व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा आणि अरबाज खान दिसणार आहेत. तसेच मराठी सिने इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करत आहेत. हा सिनेमा 20 डिसेंबरला रिलीज होत असून याचं दिग्दर्शन साउथ सुपरस्टार प्रभुदेवा करत आहे. हा सिनेमा यावर्षी 20 डिसेंबरला रिलीज होत आहे.
KBC ला मिळणार नवा करोडपती? 1 कोटींच्या प्रश्नासाठी खेळणार जेल अधिक्षक
==============================================================
SPECIAL REPORT: सत्ता स्थापनेवरुन नेटिझन्सनी शिवसेनेला केलं ट्रोल; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस