सलमानच्या वडीलांशी लग्न करुनही हेलन कधीही होऊ शकल्या नाही ‘आई’

सलमानच्या वडीलांशी लग्न करुनही हेलन कधीही होऊ शकल्या नाही ‘आई’

सलीम खान यांनी हेलन यांच्याशी लग्न केलं त्यावेळी त्यांच्या या लग्नाला सलमानच्या आईचा विरोध होता.

  • Share this:

मुंबई, 21 नोव्हेंबर : बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा सिनेमात एक हिरो आणि एक खतरनाक व्हिलन असायचा पण यात खंड पाडला तो अभिनेत्री हेलन यांनी. हेलन या एक अशा डान्सर होत्या ज्यांनी 50 व्या दशकातील सिनेमात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. आज हेलन यांचा 81 वा वाढदिवस. बर्मामधून कोलकाता आणि मग मुंबईला पोहोचलेल्या हेलन यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. हेलन यांचं पहिलं लग्न त्याच्याहून 27 वर्षांनी मोठे असलेले दिग्दर्शक एन. पी. अरोरा यांच्याशी झालं होतं पण त्यांच्या 35 व्या वाढदिवसालाच त्यांनी हे लग्न मोडलं. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात नवं वळण आलं आणि त्या लेखक सलीम खान यांच्या प्रेमात पडल्या. पण हेलन आणि सलीम यांची लव्ह-स्टोरी अजिबात सोपी होती.

सलीम खान नेहमीच त्यांच्या दोन्ही पत्नी आणि मुलांसोबत खूश असलेले दिसतात. अनेकदा सलमान खान सुद्धा सावत्र आई हेलनसोबत दिसतो. पण मीडिया रिपोर्टनुसार सलमानचे वडील सलीम खान यांनी हेलन यांच्याशी लग्न केलं त्यावेळी त्यांच्या या लग्नाला सलमानच्या आईचा विरोध होता. तसेच त्यांची 4 मुलं सलमान, सोहेल, अरबाज आणि अलवीरा हे सुद्धा सलमा यांच्याच बाजूने होते. सलमा खान यांचं खरं नाव सुशीला आहे पण 1964मध्ये सलीम खान यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांनी आपलं नाव बदलून सलमा असं केलं. त्यानंतर 1975 मध्ये सलीम खान यांच्या आयुष्यात हेलन यांची एंट्री झाली.

या महिलेच्या आवाजापुढे तर रानू मंडल सुद्धा फेल! पाहा VIRAL VIDEO

बर्मामधून आलेल्या हेलन गरीबीमुळे सुरुवातीला सिनेमात बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करत होत्या. पण हळूहळू त्या समोर आल्या आणि बॉलिवूडच्या पहिल्या कॅबरे डान्सर झाल्या. नायक-खलनायकाच्या काळात हेलन यांनी त्यांचं सिनेमातील स्थान त्यावेळी पक्कं केलं होतं. जवळापास 400 सिनेमांमध्ये काम केलेल्या हेलन यांना 2 सिनेमांसाठी फिल्म फेअर अवॉर्ड मिळाला आहे.

सलीम खान हेलन यांना खरं तर लग्नाच्या आधीपासून ओळखत होते. पण सलमा यांच्याशी लग्न केल्यानंतर ते त्यांच्या कामात बीझी झाले आणि सलमा त्यांच्या मुलांमध्ये बीझी झाल्या. त्याचवेळी हळूहळू सलीम आणि हेलन यांच्यातील जवळीक वाढत गेली. जेव्हा हे नातं कुटुंबासमोर आलं त्यावेळी सलमा यांचा या लग्नाला खूप विरोध होता. पण लग्नानंतर वेळेसोबतच हेलन यांना या कुटुंबानं त्यांच्यात सामावून घेतलं. आज सलमान खान आणि त्याच्या भावंडांचं त्यांच्या दोन्ही आईंवर खूप प्रेम आहे.

'हॉट' आणि 'बोल्ड' सीनही वाचवू शकले नाही या अभिनेत्रींचं करिअर

हेलन यांनी सलीम खान यांच्याशी लग्न तर केलं मात्र लग्नानंतर त्या कधीच आई होऊ शकल्या नाही. याबद्दल बोलताना सलीम खान सांगतात, सलमान, सोहेल, अरबाज आणि अलवीरा यांना वाटलं की त्यांना आणखी एक आई मिळाली आहे आणि हेलन यांना एक रेडिमेड कुटुंब मिळालं होतं. त्यामुळे आम्ही लग्नानंतर मुलांचा विचार केला नाही. तसेच ज्या वयात आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो ते वय मुलांबद्दल विचार करण्याचं नक्कीच नव्हतं.

थलायवा आता झाला Pride Icon Of India! महानायकाच्या सन्मानाचा सुपर VIDEO

==========================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2019 12:34 PM IST

ताज्या बातम्या