सलमान खानचे 'हे' 5 सुपरहिट सिनेमे आहेत साउथचे रिमेक

सलमान खानचे अनेक सिनेमे हे साउथचे रिमेक आहेत. मात्र असं असतानाही हे सिनेमा सुपरहिट ठरले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2019 10:07 AM IST

सलमान खानचे 'हे' 5 सुपरहिट सिनेमे आहेत साउथचे रिमेक

बॉलिवूडमध्ये रिमेकचा ट्रेंड काही आता नवा नाही. सलमान खान बद्दल बोलायचं तर त्याचे अनेक सिनेमे हे साउथचे रिमेक आहेत. मात्र असं असतानाही हे सिनेमा सुपरहिट ठरले आहेत. पाहा सलमानचे कोणते सिनेमा जे साउथचे रिमेक असतानाही बॉलिवूडमध्ये सुपरहिट ठरले आहेत.

सतीश कौशिक दिग्दर्शित 2003 मध्ये आलेला सलमान खानचा ‘तेरे नाम’ हा सिनेमा त्याच्या करिअरमधील सुपरहिट सिनेमांपैकी एक आहे. यात सलमाननं एका उत्कट प्रियकराची भूमिका साकारली होती. यातील सलमानची हेअर स्टाइल आजही सर्वांच्या लक्षात आहे. हा सिनेमा मुळ तमिळ सिनेमा ‘सेतू’चा (1999) हिंदी रिमेक आहे.

पुरी जग्गनाध लिखीत आणि दिग्दर्शित तेलुगू सिनेमा ‘पोकिरी’ हा एक सुपरहिट सिनेमा ठरला होता. या सिनेमामध्ये एक गँगस्टर दाखवण्यात आला होता जो नंतर एक अंडरकव्हर कॉप म्हणून समोर येतो. तेलुगूमधील हा सुपरहिट सिनेमा प्रभुदेवानं हिंदीमध्ये ‘वॉन्टेड’ म्हणून दिग्दर्शित केला. या हिंदी रिमेकमध्ये सलमान मुख्य भूमिकेत होता आणि सिनेमा बॉलिवूडमध्येही तुफान गाजला.

सलमानचा ‘रेडी’सिनेमा हा तेलुगू सिनेमा ‘रेडी’चा हिंदी रिमेक आहे. या सिनेमातील गाण्यांसोबत हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला आणि बॉक्स ऑफिसवर या सिनेमानं चांगला गल्ला जमवला.

2011मध्ये आलेला सलमान खानची मुख्य भूमिका असलेला ‘बॉडीगार्ड’ हा याच नावाच्या मल्याळम सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. हा मल्याळम सिनेमा 2010मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये सलमान सोबत करिना कपूर खान दिसली होती. सलमानचा हा सिनेमाही सुपरहिट ठरला होता.

Loading...

सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला 2014मध्ये आलेला ‘किक’ हा सिनेमा साजिद नाडियाडवालानं दिग्दर्शित केला होता. हा सिनेमा 2009मध्ये आलेल्या याच नावाच्या तेलुगू सिनेमाचा रिमेक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2019 06:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...