पंकज त्रिपाठीच्या 'Kaagaz' चित्रपटासाठी सलमान खानचा खास आवाज... पाहा VIDEO

पंकज त्रिपाठीच्या 'Kaagaz' चित्रपटासाठी सलमान खानचा खास आवाज... पाहा VIDEO

गेल्या काही दिवसांपासून पंकज त्रिपाठीचा आगामी चित्रपट ‘कागज’ (Kaagaz) बराच चर्चेत आहे. हा चित्रपट नुकताच ओटीटीवर रिलीज झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 09 जानेवारी: सध्या बॉलिवूडमध्ये ( Bollywood) अनेक बड्या चित्रपटांबद्दल चर्चा सुरू आहे. बर्‍याच चित्रपटांचं शूटींग सुरू आहे, तर काही चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून पंकज त्रिपाठीचा (Pankaj Tripathi) आगामी चित्रपट ‘कागज’ (Kaagaz) बराच चर्चेत आहे. हा चित्रपट नुकताच ओटीटीवर (OTT) रिलीज झाला असून या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर बरिच चर्चा सुरू आहे. या चित्रपटात बॉलिवूडच्या दबंग (Salman Khan) यांनी एक खास भूमिका साकारली आहे. पंकज त्रिपाठी यांच्या चित्रपटासाठी सलमानने प्रथमच कविता (Poetry Reading) वाचल्याचं आता समोर आलं आहे. नुकताच याचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

खरंतर, अलिकडेच या चित्रपटाशी संबंधित एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये सलमान खान एक कविता वाचताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये असं दिसून येत आहे की, सलमान कवितांच्या माध्यमातून 'कागज' चित्रपटाच्या कथेचं सार सांगत आहे. सलमान खान  जीवनात कागदाचं असलेलं महत्त्व स्पष्ट करित आहे. या कवितेचे बोल खूपच सुंदर आहेत, यामुळे प्रत्येकजण सलमान खानची प्रशंसा करताना दिसत आहे.

या कवितेची सुरुवात 'कुछ नहीं है, मगर है सब कुछ भी, क्या अजब चीज़ है ये काग़ज़ भी'... या अप्रतिम कडव्यापासून होते. हे पूर्ण गाणं येथे पाहा...

कागज हा चित्रपट सलमान खान आणि सतीश कौशिक यांच्या कंपनीने निर्मित केला आहे. सलमान खानने प्रथमच एखाद्या चित्रपटात कविता वाचली आहे. त्याची शैली सलमान खानच्या चाहत्यांकडून खूपच पसंत केली जात आहे. या चित्रपटाची कथा खूपच मनोरंजक आहे. या चित्रपटाची कथा एका व्यक्तीविषयी आहे, जो कागदोपत्री मृत घोषित झाला आहे. तो त्याच्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे.

Published by: News18 Desk
First published: January 9, 2021, 10:40 PM IST

ताज्या बातम्या