मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Bathukamma Song: साऊथ स्टाइलमध्ये सलमान-शेहनाजचा स्वॅग; किसी का भाई किसी की जानच्ं धमाकेदार गाणं

Bathukamma Song: साऊथ स्टाइलमध्ये सलमान-शेहनाजचा स्वॅग; किसी का भाई किसी की जानच्ं धमाकेदार गाणं

salman khan

salman khan

सलमान खानचा कधीच न पाहिलेला लुक या गाण्यात दिसतोय. डोळ्यांवर गॉगल, लुंगी घालून भाईजान साऊथ हिरोंना टशन देताना दिसतोय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

 मुंबई, 31 मार्च : अभिनेता सलमान खानच्या 'किसीका भाई किसी की जान' सिनेमाची मागील काही महिन्यांपासून चर्चा आहे. सिनेमासाठी सलमानचे फॅन्स चांगलेच उत्साही आहेत. पठाणनंतर सलमान खान आणखी एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान किसी का भाई किसी जान सिनेमाचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात सलमान खानचा कधीच न पाहिलेला अंदाज पाहायला मिळतोय. सलमान खान चक्क साऊथ इंडियन लुकमध्ये दिसतोय. डोळ्याला गॉगल, लुंगी घालून भाईजानचा कडक स्वॅग पाहायला मिळत आहे. Bathukamma असं गाण्याचं नाव आहे.

Bathukamma गाण्यात अभिनेत्री पूजा हेगडे देखील फारच सुंदर दिसतेय. पूजा हेगडे गाण्यात आपल्या कुटुंबाबरोबर देवीची पूजा करताना दिसतेय. तिच्याबरोबर अभिनेता व्यंकटेश दग्गुबाती आणि बॉलिवूड अभिनेत्री भूमिका चावला देखील दिसत आहेत. त्याचप्रमाणे मराठमोळी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी देखील सिनेमात प्रमुख भूमिकेत  आहेत. गाण्यात रोहिणी हट्टंगडी यांचा पहिला लुक पाहायला मिळाला आहे.

हेही वाचा - भर रस्त्यात बंद पडली कार, गुंडांनी हेरून मीना कुमारीकडे केली 'ही' मागणी, सारेच झाले हैराण

पूजा हेगडे गाण्यात दांडिया घेऊन नाचताना दिसत आहे. देवीच्या पूजेचं सेलिब्रेशनसाठी सगळे गावकरी एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. पूजा हेगडे हुक स्टेप देखील करताना दिसतेय. तिच्या साऊथ इंडियन लुकला चाहत्यांची पसंती मिळतेय. पूजा हेगडे नाचात दंग असताना इकडे सलमान खान त्याच्या संपूर्ण गँगबरोबर मोठ्या स्वॅगमध्ये येताना दिसतोय.

" isDesktop="true" id="859046" >

सलमान खान आपल्या गँगबरोबर पूजा हेगडेच्या घरी येताना दिसतोय. डोळ्यांवर गॉगल, लुंगी घालून साऊथ हिरोंना टशन देताना दिसतोय. सलमानबरोबर शहनाज गिल, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, पलक तिवारी आणि जस्सी गिल देखील दिमाखात येताना दिसत आहे.  सलमान आणि शेहनाजला पहिल्यांदा साऊथ कल्चरमध्ये तेलुगू आऊटफिट्समध्ये पाहून चाहते भलतेच खुश झालेत.

Bathukamma हे गाणं संतोष वेंकी, आयरा उडुपी, हरिणी इवातुरी, सुचेता बसरूर आणि विजयलक्ष्मी मेत्तिनाहोल यांनी मिळून केलं आहे. याआधी किसी का भाई किसी जान सिनेमातील 'बिल्ली बिल्ली', 'जी रहे थे हम', 'नाइयो लगदा' ही गाणी देखील रिलीज झाली आहेत.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News