पाहा Dabangg 3 Trailer : ‘मारेंगे भी हम, बचाएंगे भी हम’, जबरदस्त अॅक्शनवाला सलमानचा चुलबुल पांडे अवतार

पाहा Dabangg 3 Trailer : ‘मारेंगे भी हम, बचाएंगे भी हम’, जबरदस्त अॅक्शनवाला सलमानचा चुलबुल पांडे अवतार

सलमान खानच्या ज्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, अखेर त्या दबंग-3चा ट्रेलर रिलीज झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 23 ऑक्टोबर : सलमान खानच्या ज्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, अखेर त्या दबंग-3चा ट्रेलर रिलीज झाला आहे. याआधी सलमाननं आपल्या दबंग-3 सिनेमाचे प्रमोशन चुलबुल पांडेच्या अंदाजात करणार असल्याचे सांगितले होते. या सिनेमात पुन्हा एकदा सलमान खान, सोनाक्षी सिन्हा आणि अरबाज खान दिसणार आहे. त्याचबरोबर या सिनेमात पदार्पण करणार आहे, दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर.

या सिनेमाचा ट्रेलर दमदार असून सलमान खानचा चुलबुल पांडेचा लुक हिट होणार याद काही वाद नाही. तर, या सिनेमात दबंगमध्ये दिसलेली सलमान आणि सोनाक्षी यांची केमेस्ट्री पुन्हा एकदा दिसणार आहे. सलमान या सिनेमात ‘पोलिसवाला गुंडा’ झाला आहे. याच बरोबर सलमान या सिनेमात सईसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

वाचा-तब्बल 7 तास 20 मिनिटांचा ट्रेलर तर चित्रपट 30 दिवसांचा, फक्त एकच शो दाखवणार

या सिनेमामध्ये एक-दोन नाही तर तब्बल पाच ते सहा दमदार डायलॉग आहेत. पाहा हा सिनेमाचा दमदार ट्रेलर.

वाचा-वयाच्या 46व्या वर्षी तोडल्या बोल्डनेसच्या सीमा,11वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट

दबंग-3चे दिग्दर्शन प्रभू देवानं केले आहे. याचबरोबर या सिनेमामध्ये साऊथचा स्टार किच्चा सुदीप खलनायकाच्या रूपात दिसणार आहे. 20 डिसेंबरला हा सिनेमात प्रदर्शित होणार असून या सिनेमातची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा हिंदी सोबतच तमिळ, तेलुगू आणि कन्नड या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे सलमान स्वतःच या तिन्ही भाषांमध्ये हा सिनेमा डब करणार आहे. या सिनमाचं दिग्दर्शन साउथ स्टार प्रभूदेवा करत आहे. 'दबंग 3' व्यतिरिक्त सलमानकडे 'किक 2' , 'टायगर जिंदा है सिक्वेल', 'नो एंट्री मे एंट्री' आणि 'शेरखान' हे सिनेमा आहेत.

वाचा-साराचा श्रीलंकेच्या बीचवर Vacation; बिकिनी लूकवर तुम्हीही व्हाल फिदा!

नुकत्याच समोर आलेल्या काही रिपोर्टनुसार सलमाननं स्वतः दबंग 3 साठी काही संवाद लिहिले आहेत. तसेच त्याच्या सांगण्यावरून सिनेमाच्या काही डायलॉग्समध्येही बदल करण्यात आले आहेत. सलमान नेहमीच सेटवर इनपुट्स देत असतो. ज्याचा सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये समावेश केला जातो. याशिवाय या सिनेमात तो हाय ऑक्टेन अ‍ॅक्शन सीनच्या कोरिओग्राफीमध्येही महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2019 07:36 PM IST

ताज्या बातम्या