मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सलमान खानच्या शर्टलेस फोटोवर EX गर्लफ्रेंडची प्रतिक्रिया, अ‍ॅब्ज पाहून म्हणाली...

सलमान खानच्या शर्टलेस फोटोवर EX गर्लफ्रेंडची प्रतिक्रिया, अ‍ॅब्ज पाहून म्हणाली...

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा फिटनेसचा आदर्श मानला जातो. आपल्या दमदार अभिनयासोबतच तो त्याच्या जबरदस्त बॉडीमुळे देखील चर्चेत राहतो. वयाच्या 55 ​​व्या वर्षीही तो फिटनेसच्या बाबतीत नवीन आणि तरुण कलाकारांना मागे टाकतो.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 21 डिसेंबर- बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा फिटनेसचा आदर्श मानला जातो. आपल्या दमदार अभिनयासोबतच तो त्याच्या जबरदस्त बॉडीमुळे देखील चर्चेत राहतो. वयाच्या 55 ​​व्या वर्षीही तो फिटनेसच्या बाबतीत नवीन आणि तरुण कलाकारांना मागे टाकतो. असं असलं तरी फिटनेसच्या (Salman Khan Fitness) बाबतीत युवा स्टार्स सलमान खानला आपला आदर्श मानतात.त्याने इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो कॅप घालून त्याचे एब्स फ्लॉंट करताना दिसत आहे.

सलमान खानच्या या फोटोवर त्याचे फॉलोअर्स आणि चाहते जोरदार कमेंट करत आहेत. इतकेच नाही तर त्याची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) हिनेही त्याच्या या फोटोवर कमेंट केली आहे. ज्याची सध्या खूप चर्चा होत आहे. संगीता बिजलानीने सलमान खानच्या फोटोवर केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

वाचा-'मी गुलजार यांच्याकडे स्कर्ट मागितला आणि..', नीना यांनी सांगितला 'तो' किस्सा

सलमान खानच्या या फोटोवर संगीता बिजलानीने फायर इमोजीद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. यावरून ती सलमान खानच्या फिटनेसनेही खूप प्रभावित झाल्याचे दिसून येते. त्याचबरोबर इतर युजर्सनी सलमान खानच्या फोटोवर कमेंट करत त्याच्या फिटनेसवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्‍यापैकी अनेकांचे म्हणणे आहे की, तो कोठूनही 55 वर्षांचा दिसत नाही. तो न्यूकमर अभिनेत्यासारखा दिसतो.

salman khan, salman khan shirtless photo

फोटोमध्ये सलमान खान बीइंग ह्युमनची कॅप घालून जिममध्ये दिसत आहे. त्याचा हा फोटो पाहून त्याचे चाहतेही त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. एका चाहत्याने कमेंट करताना लिहिले आहे की, 'भाऊ तुम्ही पण काय मजाक करत आहात. जेव्हा तुम्ही शर्टलेस होता तेव्हा कुठल्या मूर्खचे टोपीकडे लक्ष जाईल. तर एकाने लिहिले आहे की, ‘ईस्ट या वेस्ट भाई की बॉडी सबसे बेस्ट.’

वाचा-वर्दीचा सन्मान करतो पण..'; Bhuj फिल्मबाबत बोलताना शरदने व्यक्त केली खंत

आत्तापर्यंत सलमान खानच्या या फोटोला 10 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. त्याचवेळी कमेंट्सची संख्या देखील वाढत आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकताच भाईजानचा 'अंतीम: द फायनल ट्रुथ' हा सिनेमा रिलीज झाला आहे. ज्यामध्ये सलमान खान व्यतिरिक्त त्याचा मेहुणा आयुष शर्मा देखील आहे. याशिवाय सलमान खान सध्या त्याच्या आगामी टायगर 3 चित्रपटच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Salman khan