लॉकडाऊनमध्ये सलमान खानने शेतात गाळला घाम; भाईजानची अशी झाली अवस्था

लॉकडाऊनमध्ये सलमान खानने शेतात गाळला घाम; भाईजानची अशी झाली अवस्था

कोरोना लॉकडाऊनमध्ये अभिनेता सलमान खान (salman khan) आपल्या पनवेलमधील फार्म हाऊसवर आहे.

  • Share this:

मुंबई, 14 जुलै : अभिनेता सलमान खान (salman khan) लॉकडाऊनमध्ये पनवेलमधील आपल्या फार्म हाऊसवर आहे. इथं त्याने आपली गाणीदेखील शूट करून रिलीज केली. जी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली दरम्यान सलमान आपल्या या फार्म हाऊसवरील शेतातही राबताना दिसला. काही दिवसांपूर्वीच सलमानने आपला शेती करतानाचा फोटो शेअर केला होता. यानंतर आता त्याने आणखी एक फोटो शेअर केला आहे.

सलमान खान या फोटोमध्ये जमिनीवर बसलेला आहे. त्याचं शरीर चिखलाने माखलं आहे. तो खूप थकलेलाही वाटत आहे. या फोटोत त्याने नतमस्तक होऊ शेतकऱ्यांप्रती आदर दाखवला आहे. सर्व शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ असं त्याने या फोटोला कॅप्शनही दिलं आहे.

View this post on Instagram

Respect to all the farmers . .

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सलमानने याधी शेती करताना आपला एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तो शेतात उभा आहे आणि त्याच्या हातात त्याने पिक घेतलं आहे. 'दाने दाने पर लिखा होता है, खाने वाले का नाम। जय जवान, जय किसान।' असं कॅप्शन सलमानने या फोटोला दिलं होतं.

View this post on Instagram

Daane daane pe likha hota hai khane wale Ka naam... jai jawan ! jai kissan !

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

दरम्यान सलमानचा बॉडीगार्ड शेरानेदेखील त्याचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत दोघंही या वातावरणात आनंद लुटताना दिसले.

View this post on Instagram

Following the Legend........ My Maalik @Beingsalmankhan #Salmankhan #Legend #Sheraa #Beingsheraa

A post shared by Being Sheraa (@beingshera) on

दरम्यान सलमानचे हे फोटो पाहिल्यानंतर नेटिझन्सनी त्याला ट्रोल केलं आहे. त्याच्या या फोटोवर नकारात्मक अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सलमान खान देखील सुशांतच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आहे.

हे वाचा - गुन्हेगार मित्रांच्या दोस्तीची कथा; YAARA च्या धडाकेबाज ट्रेलरचा VIDEO पाहा

सलमान आता 'राधेः योर मोस्ट वॉन्टेड भाई' चित्रपटात दिसणार आहे. प्रभु देवा यांनी ही फिल्म दिग्दर्शित केली आहे. या चित्रपटात दिशा पाटनी, रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ आहे. ईदच्या दिवशी हा चित्रपट रिलीज होणार होता मात्र कोरोना लॉकडाऊनमुळे त्याचं रिलीज पुढे ढकलण्यात आलं आहे.

Published by: Priya Lad
First published: July 14, 2020, 7:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading