VIDEO- सलमानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दबंगपेक्षा कुत्र्यानेच जिंकलं मन

salman khan सलमान सध्या चांगल्या मूडमध्ये असून चित्रीकरणातून त्याने थोडा ब्रेक घेतला असंच वाटतं.

News18 Lokmat | Updated On: Jun 20, 2019 01:56 PM IST

VIDEO- सलमानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दबंगपेक्षा कुत्र्यानेच जिंकलं मन

मुंबई, 20 जून- सलमान खान एका सिनेमाचं चित्रीकरण संपलं की लगेच दुसऱ्या सिनेमाच्या कामाच्या तयारीला लागतो. सोशल मीडियावरही तो फारसा सक्रिय नसतो. पण सध्या तो इन्स्टाग्रामवर बराच सक्रिय झाला आहे. दररोज तो त्याचे व्हिडिओ शेअर करत असतो. त्याच्या भारत सिनेमाने २०० कोटींच्या पुढे गल्ला कमावला आहे. या सगळ्यात त्याने स्वतःचा व्यायाम करतानाचा एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये सलमानपेक्षा त्याच्या कुत्र्याचीच चर्चा जास्त होत आहे.

सलमानने इन्स्टाग्रामवरील व्हिडिओत व्यायाम करताना आणि स्ट्रेचिंग करताना दिसतो. थोड्यावेळाने तिकडे एक कुत्रा येतो आणि हळूच कॅमेऱ्या समोर निवांत बसतो. सलमानने या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटलं की, ‘फक्त सशक्त होणं पुरेसं नसतं, लवचिकताही असावी. बिइंग स्ट्राँगचे साहित्या गेल्या दोन महिन्यांत १०० जिममध्ये बसवण्यात आली आहेत.’ सलमानचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर कमालिचा व्हायरल होत आहे.

जोडी असावी तर अशी! भावाच्या लग्नात बॉयफ्रेंडसोबत सुश्मिता सेनचा रोमँटिक डान्स
निखिलची झाली नुसरत, शपथविधीआधी भारताच्या सर्वात सुंदर खासदारने घेतल्या सप्तपदी

विशेष म्हणजे याआधी दबंग खानने भाऊ सोहेल खानचा मुलगा योहानच्या बर्थडे पार्टीचे काही व्हिडिओ शेअर केले होते. तर त्याआधी सुरक्षा रक्षकांना व्यायामाच्या मशिनवर बसवून मशिनचं वर्कआउट करताना तो दिसला होता. यावरूनच सलमान सध्या चांगल्या मूडमध्ये असून चित्रीकरणातून त्याने थोडा ब्रेक घेतला असंच वाटतं.

VIDEO : सेटवर घुसून कलाकारांना रॉडने मारहाण, माही गिलला दुखापत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 20, 2019 01:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close