मुंबई, 21 जानेवारी : सुपरस्टार (superstar) सलमान खान (Salman khan) कायमच चर्चेत असतो. कधी त्याच्या सिनेमांमुळं तर कधी त्याच्या सामाजिक कार्यामुळं(social work) . आता तो अजून एका छानच कारणामुळं चर्चेत आला आहे.
सलमानच्या चर्चेत येण्याचं कारण आहे, त्याचा अंगरक्षक अर्थात बॉडीगार्ड (bodyguard) शेरा. सलमाननं नुकताच त्याच्या अंगरक्षकासह एक फोटो शेअर केला. यात तो या बॉडीगार्डच्या म्हणजेच शेराच्या खांद्यावर हात ठेऊन उभा आहे. या फोटोला सलमाननं कॅप्शन दिलं आहे, 'वफादारी'. या फोटोओळीवरून स्पष्ट होतं, की सलमानला शेरा खूप आवडतो. सलमान जिथे कुठे जातो, शेरा सावलीसारखा सतत त्याच्यासोबतच असतो.
मागच्या 24 वर्षांपासून शेरा सलमानचं रक्षण करत आहे. साहजिकच शेरा सलमानसाठी एका कर्मचाऱ्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. शेराचं खरं नाव आहे गुरमीत सिंह जॉली. शेरा सलमानच्या कुटुंबातलाच एक सदस्य झाला आहे. सलमानसोबत राहता-राहता दोघांचे सूर इतके जुळले, की आता शेरा सलमानचा सर्वात आवडता अंगरक्षक आहे.
सलमानला जिथं पोचायचं असेल तिथं जाऊन शेरा एक दिवस आधीच पाहणी करतो. अनेकदा रस्ता साफ-सुरक्षित करवून घेण्यासाठी त्याला पाच-पाच किलोमीटर पायी चालावं लागतं. शेरानं आजवर शरीरसौष्ठव स्पर्धेत ज्युनियर मि. मुंबई आणि ज्युनियर मि. महाराष्ट्रसारखे सन्मान जिंकले आहेत.
शेरा मुंबईत सलमानच्या शेजारी राहत असे. नंतर तो सलमानचा बॉडीगार्ड बनला. सलमानच्याच सांगण्यावरून शेरानं काही वर्षांपूर्वी त्याची 'विजक्रॉफ्ट' नावाची इव्हेन्ट कंपनीही सुरू केली. सोबतच 'टायगर सिक्युरिटी' नावाची एक कंपनीही तो चालवतो. सांगितलं जातं, की पूर्वी शेरा भारतात येणाऱ्या हॉलिवूड स्टार्सना (Hollywood stars) सुरक्षा देत असे.