अखेर म्हातारा झाला सलमान खान, 'भारत'च्या नवीन पोस्टरमध्ये दिसला अनोखा अंदाज

अखेर म्हातारा झाला सलमान खान, 'भारत'च्या नवीन पोस्टरमध्ये दिसला अनोखा अंदाज

जेवढे पांढरे केस माझ्या दाढी आणि डोक्यावर आहेत. त्याहून कित्येक पटींनं माझं आयुष्य रंगीत आहे - सलमान खान

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : अभिनेता सलमान खान याचा बहुचर्चित आगामी सिनेमा 'भारत' नवीन लुक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यापूर्वी भारत सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. ज्यामध्ये केवळ सलमान खानलाच दाखवण्यात आले होतं. यानंतर आता प्रदर्शित झालेल्या नवीन लुकच्या पोस्टरवर केवळ सलमानच दिसत आहे. पण यामध्ये एका वेगळ्याच अंदाज सलमान या पोस्टरवर  पाहायला मिळत आहे. यामध्ये सलमान वयोवृद्ध अवस्थेत दिसत आहे. तसेच त्यावर वर्ष 2010 असं लिहिलं आहे. हे नवं पोस्टर आपल्या ट्विटरवर शेअर करत सलमाननं चाहत्यांना याबाबतची माहिती दिली.सलमाननं ट्विटरवर 'भारत'चं नवं पोस्टर शेअर करताना लिहिलं, 'जेवढे पांढरे केस माझ्या दाढी आणि डोक्यावर दिसत आहेत. त्याहून कित्येक पटीनं माझं आयुष्य रंगीत आहे'. सलमाननं पोस्ट केलेल्या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी सलमानच्या या लुकचं खूप कौतुक केलं आहे तर काहींनी मात्र त्याची खिल्ली उडवली आहे. एका युझरनं तर सलमानची तुलना चक्क घुबडाशी केली आहे. 'सल्लू बनला उल्लू' असं या युझरनं म्हटलं आहे. 'भारत'चा हा नवा लुक काही वेळातच ट्विटरवर ट्रेंड झाला आहे.अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' यावर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. या सिनेमात सलमान एकाच व्यक्तीच्या 22 ते 75 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील वेगवेगळ्या भूमिका साकारत आहे. सिनेमात अभिनेत्री कतरिना कैफचीही मुख्य भूमिका आहे. सुरुवातीला ही भूमिका प्रियांका चोप्राला देण्यात आली होती. मात्र ऐनवेळी प्रियांकानं सिनेमातून माघार घेतल्यावर तिच्याऐवजी कतरिना कैफला सिनेमात कास्ट करण्यात आलं.

वाचा अन्य बातम्या

World Cup : भारताच्या अगोदर ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, या 5 जणांना वगळल्याने आश्चर्य

'चौकीदार चौर हैं'बाबत केलेल्या वक्तव्यानंतर राहुल गांधी अडचणीत? सुप्रीम कोर्टाकडून नोटीस

VIDEO: जयाप्रदांविरोधात आधी आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर सारवासारव

VIDEO : 'पुन्हा असं बोलायचं नाही', जाहीर सभेतच शरद पवारांनी दिली अमरसिंह पंडितांना वॉर्निंग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 01:20 PM IST

ताज्या बातम्या