Dabangg 3 मध्ये दमदार अ‍ॅक्शन सीन, सलमाननं शेअर केला VIDEO

Dabangg 3 मध्ये दमदार अ‍ॅक्शन सीन, सलमाननं शेअर केला VIDEO

प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता कायम ठेवण्यासाठी सलमाननं सिनेमात एक अ‍ॅक्शन सीन चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : मागच्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये बिग बजेच सिनेमा एकमागोमाग रिलीज होत आहेत आणि येत्या काळातही हा धडाका सुरुच राहणार आहे. कारण पुढच्या आठवड्यात सलमान खानचा बहुचर्चित सिनेमा ‘दबंग 3’ रिलीज होणार आहे. दबंग फ्रेंचाइजीचा हा तिसरा सिनेमा आहे. या सिनेमात सलमान एक नाही तर दोन-दोन अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. तसेच या सिनेमात फक्त रोमान्सच नाही तर बरेच अ‍ॅक्शन सीन सुद्धा असणार आहेत. नुकताच सलमाननं या सिनेमातील एक अ‍ॅक्शन सीनचा व्हिडीओ शेअर केला. ज्यात तो सिनेमातील दमदार डायलॉग बोलताना दिसत आहे.

'दबंग 3' रिलीज होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. हा सिनेमा 20 डिसेंबरला रिलीज होत आहे. त्यामुळे सध्या सलमान या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. पण प्रमोशनासोबतच प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता कायम ठेवण्यासाठी सलमाननं सिनेमात एक अ‍ॅक्शन सीन चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हा या सिनेमातील अ‍ॅक्शन सीनचा प्रोमो आहे. ज्यात सलमान खान सिनमातील खलनायक किच्चा सुदीपसोबत जबरदस्त फाइट करताना दिसत आहे. यावरुन या सिनेमात दमदार अ‍ॅक्शन सीन पाहायला मिळणार असल्याचं दिसत आहे.

रानू मंडलचं नाव ऐकताच भडकला हिमेश रेशमिया, म्हणाला...

 

View this post on Instagram

 

At the Dabangg3 event for launch of the song #MunnaBadnaamHua @prabhudevaofficial #Dabangg3 @skfilmsofficial

A post shared by Chulbul Pandey (@beingsalmankhan) on

या प्रोमोमध्ये चुलबुल पांडे एक डायलॉग बोलताना दिसत आहे. हा डायलॉग आहे, ‘जिसके आगे हो अली और पीछे हो बजरंगबली. उसका क्या बिगाड़ सकता है बली’ यासिनेमात किच्चा सुदीप व्हिलन बलीची भूमिका साकारत आहे. या सिनेमात या दोघांमध्ये एकच नाही तर अनेक अ‍ॅक्शन सीन असणार आहेत. सलमान खाननं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'बाली सिंह जैसे विलेन से भिड़ने का अलग ही मजा है..टक्कर इस बार जबरदस्त होगी'.

अभिनेत्री उर्वशी रौतेला करतेय क्रिकेटर वृषभ पंतला डेट?

दबंग फ्रेंचायजीचा तिसरा सिनेमा ‘दबंग 3’चं दिग्दर्शन प्रभूदेवानं केलं आहे. या सिनेमात सलमान खान व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान, माही गिल, महेश मांजरेकर आणि नवोदित अभिनेत्री सई मांजरेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करत आहे. या सिनेमात ती सलमान खानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

बॉक्सऑफिसवर 2020मध्ये होणार मोठी टक्कर, या कलाकारांमध्ये रंगणार तगडी स्पर्धा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2019 03:43 PM IST

ताज्या बातम्या