VIDEO : सलग 36 सेकंद 'आझादी'वर बोलणाऱ्या या मुलीचा सलमानही झाला चाहता

VIDEO : सलग 36 सेकंद 'आझादी'वर बोलणाऱ्या या मुलीचा सलमानही झाला चाहता

Salman Khan | Bharat | सलमाननं नुकताच त्याच्या सोशल हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी मराठी आणि हिंदी भाषेत बोलताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 30 जून : बॉलिवूड अभिनेता सलमान खान सोशल मीडियावर खूप सक्रीय असतो. तो नेहमीच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याच्या चाहत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. सलमाननं नुकताच त्याच्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्याचं संपूर्ण सोशल मीडियावर कौतुक होत आहे. या व्हिडिओमध्ये फोकस सलमान पेक्षा एका लहान मुलीवर आहे. सलमाननं शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कबीर सिंगनंतर अर्जुन रेड्डी झाला कियाराचा चाहता, म्हणाला...

सलमाननं नुकताच त्याच्या सोशल हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी मराठी आणि हिंदी भाषेत बोलताना दिसत आहे. 36 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये ही मुलगी भारताच्या स्वातंत्र्याची गाथा सांगत आहे. यामध्ये तिनं भगत सिंह पासून ते राणी लक्ष्मीबाई पर्यंत सर्वांची नावं तिने घेतली आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना सलमाननं त्याला, ‘मुलामुलांमध्ये भारत’ असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडिओमध्ये सलमान ग्रीन टी-शर्ट आणि रेड शॉर्ट्समध्ये दिसत आहे. वाऱ्यामुळे या व्हिडिओमध्ये तितकासा स्पष्ट आवाज येत नाही. पण या मुलीचं बोलणं ऐकून सलमान खान एवढा प्रभावित झाला की तो टाळ्या वाजवण्यापासून स्वतःला थांबवू शकला नाही.

शाहरुख खानची लेक सुहाना झाली ग्रॅज्यूएट, मिळाला 'हा' खास पुरस्कार

सलमाननं हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याच्यावर नेटीझन्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. सर्वजण या लहान मुलीचं कौतुक करताना दिसत आहेत. सलमानच्या भारत सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 200 कोटींची आकडा पार केला. या सिनेमात त्याच्यासोबत कतरिना कैफ, सुनील ग्रोवर, दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ, तब्बू आणि नोरा फतेही हे कलाकार झळकले. त्यानंतर आता सलमाननं त्याचा आगामी सिनेमा ‘दंबग 3’च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. याशिवाय संजय लीला भन्साळी यांच्या इन्शाअल्लाह या सिनेमाची घोषणा झालीअसून या सिनेमात सलमान अलिया भटसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

VIDEO : सुनैना रोशन प्रकरणावर अखेर कंगनानं सोडलं मौन

=========================================================

VIDEO: मुसळधार पावसामुळे रस्ता पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 30, 2019 09:45 AM IST

ताज्या बातम्या