मुंबई, 14 फेब्रुवारी : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘पठाण’ (Pathan) असं या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं नाव आहे. चाहत्यांसाठी आनंदाची बाबमी म्हणजे या चित्रपटात बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan ) देखील झळकणार आहे. बिग बॉस (Bigg Boss 14) संपताच या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल.
इंडियन एक्सप्रेसननं दिलेल्या वृत्तानुसार सलमान या चित्रपटात एक महत्वाची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेमुळं चित्रपटाच्या कथानकाला एक वेगळच वळण मिळेल असं म्हटलं जात आहे. गेले काही महिने याबाबत केवळ चर्चा होती. परंतु अखेर स्वत: सलमाननं या चर्चेला दुजोरा दिला आहे.
खरं तर ‘बिग बॉस’ संपताच सलमान ‘टायर 3’ या चित्रपटाचं चित्रीकरण करणार होता. पंरतु आपला खास मित्र शाहरुखसाठी त्यानं आपल्या वेळापत्रकात बदल करुन आधी तो पठाणचं चित्रीकरण पूर्ण करणार आहे. परिणामी शाहरुखच्या चित्रपटात सलमानचं आगमन झाल्यामुळे चाहत्यांची देखील उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
अवश्य पाहा - पाहा आयुष्मानच्या पत्नीचा बाथरुम सेल्फी; सांगितले वजनदार शरीराचे फायदे
‘पठाण’ हा शाहरुखचा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. दोन वर्षांपूर्वी शाहरुखचा झिरो हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीस आला होता. परंतु हा चित्रपट सुपरफ्लॉप ठेरला. अनेक समिक्षकांनी देखील या चित्रपटाची जोरदार खिल्ली उडवली होती. परिणामी शाहरुखचे चाहते पठाणची आतुरने वाट पाहात आहेत. या बिग बजेट चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण, डिंपल कपाडिया, जॉन अब्राहम देखील काम करणार आहे. शिवाय आता स्टारकास्टमध्ये सलमानचं आगमन झाल्यामुळे पठाणबाबत प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
Published by:Mandar Gurav
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.