सलमाननं दिला अफवांना पूर्णविराम, 'लडकी' आहे 'लव्हरात्री'साठीची नायिका

सलमाननं दिला अफवांना पूर्णविराम, 'लडकी' आहे 'लव्हरात्री'साठीची नायिका

सिनेमासाठी अभिनेत्रीचा शोध इतके दिवस सुरू होता. अखेर कॅडबरी गर्ल वारिना हुसेन हिची या सिनेमासाठी वर्णी लागलीय.

  • Share this:

06 फेब्रुवारी : सलमानने नुकतच एक ट्विट केलंय ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चांनी जोर धरलाय...'मुझे लडकी मिल गयी,' असं ट्विट करत सल्लू मियाने चौकार मारला आणि ट्विटरवर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली.सलमान खान लग्न करतोय की काय याबद्दल कुतूहल वाढलं असताच सलमानने थोड्याच वेळात दुसरं ट्विट केलं. आणि या सर्व अफवांवर पूर्णविराम मिळाला.

सलमानची बहीण अर्पिता खानचा नवरा आयुष शर्मा लवकरच लव्हरात्री या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमासाठी अभिनेत्रीचा शोध इतके दिवस सुरू होता. अखेर कॅडबरी गर्ल वारिना हुसेन हिची या सिनेमासाठी वर्णी लागलीय.सो डोण्ट वरी बी हॅपी असं म्हणालाय सलमान खान त्याच्या दुसऱ्या ट्विटमध्ये...

First published: February 6, 2018, 3:11 PM IST

ताज्या बातम्या