मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अखेर सलमान खाननं केली 'दिल की बात', कतरिनाला म्हणाला...

अखेर सलमान खाननं केली 'दिल की बात', कतरिनाला म्हणाला...

सलमान खान आणि कतरिना कैफ यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जेवढी प्रेक्षकांना आवडते. पण आता सलमाननंही त्याच्या मनातली गोष्ट कतरिनाला बोलून दाखवली.

सलमान खान आणि कतरिना कैफ यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जेवढी प्रेक्षकांना आवडते. पण आता सलमाननंही त्याच्या मनातली गोष्ट कतरिनाला बोलून दाखवली.

सलमान खान आणि कतरिना कैफ यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जेवढी प्रेक्षकांना आवडते. पण आता सलमाननंही त्याच्या मनातली गोष्ट कतरिनाला बोलून दाखवली.

  मुंबई, 07 सप्टेंबर : सलमान खान आणि कतरिना कैफ यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जेवढी प्रेक्षकांना आवडते. तेवढ प्रेक्षक त्यांना ऑफस्क्रीन सुद्धा पसंत करतात. सोशल मीडियावर तर त्यांच्या नात्याविषयी अनेकदा बोललं जातं. मात्र हे दोघंही या सर्व फक्त अफवा असल्याचं सांगतात. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कतरिना सलमानसोबतच्या नात्याविषयी मोकळेपणानं बोलली. सलमान आणि तिच्यामध्ये नेमकं काय नातं आहे हेही तिनं स्पष्ट केलं. त्यापूर्वी सलमाननंही त्याच्या मनातली गोष्ट कतरिनाला बोलून दाखवली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आयफा अवॉर्ड 2019 ची प्रेस कॉन्फरन्सच्या वेळचा आहे. प्रेस कॉन्फरन्स दरम्यान कतरिनाला निघून जाताना पाहून सलमान माइक हातात घेतो आणि तिला विचारतो, ‘तू जात आहेस का? तूस्सी ना जाओ’ सलमानचं असं बोलणं ऐकून कतरिना हसू लागते आणि तिथं उपस्थित असलेल्यामध्येही एकच हाशा पिकला. याची पावती फाडा रे!, सलमान खानचा 'हा' VIDEO पाहून नेटीझन्सची सटकली
  नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत कतरिनानं सलमान आणि माझी ऑनस्क्रीन केमिस्ट्री जशी आहे तरी रिअल लाइफमध्ये अजिबात नाही. पण त्यानं मला प्रत्येक वेळी मदत केली आहे. एक मित्र म्हणून तो प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी उभा असतो. प्रत्येक यशानंतर माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. सासरी जाणाऱ्या मुलीनं बनवलेला हा VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, आता काय करावं?
   
  View this post on Instagram
   

  Happy birthday Katrinaaa... @katrinakaif

  A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

  आयफा अवॉर्ड 2019 ची प्रेस कॉन्फरन्स नुकतीच पार पडली यावेळी अभिनेत्री कतरिना कैफ आणि माधुरी दीक्षित यांनी सलमानसोबत या ठिकाणी हजेरी लावली होती. सलमान खान या पूर्ण इव्हेंटच्या वेळी मस्तीच्या मूडमध्ये दिसला. सलमाननं यावेळी फॉर्मल ब्लॅक शर्ट आणि ब्लू ट्राउझर घातली होती. मात्र त्याचं वागणं मात्र नेहमीप्रमाणंच कॅज्यूअल होतं. कतरिना कैफ बद्दल बोलायचं तर शॉर्ट डेनिम ड्रेसमध्ये दिसली. तर धकधक गर्ल माधुरी दीक्षित सुद्धा यावेळी ग्लॅमरस अंदाजात दिसली. दरवर्षी हा इव्हेंट देशाच्या बाहेर आयोजित केला जातो मात्र यंदा हा अवॉर्ड सोहळा भारतात आयोजित केला जाणार आहे. प्रेग्नन्सीनंतर सोशल मीडियावरील 'बोल्ड' फोटोमुळे लिसा हेडन चर्चेत सलमानच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायच तर तो सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘दबंग 3’ शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमा अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोबतच अभिनेता महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर सुद्धा सलमान सोबत स्क्रिन शेअर करणार आहे. काही दिवासांपूर्वी या सिनेमातील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर सलमाननं सेटवर मोबाइल वापरण्यासाठी बंदी घातली. ========================================================= भरलेलं सिलेंडर घेऊन विद्युतचं खतरनाक वर्कआऊट, पाहा हा VIDEO
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Salman khan

  पुढील बातम्या