'कतरिनानं मला सोडलं', सलमान खाननं केला गौप्यस्फोट

'कतरिनानं मला सोडलं', सलमान खाननं केला गौप्यस्फोट

सलमान खान आणि कतरिना कैफ 2009मध्ये एकमेकांपासून वेगळे झाले.

  • Share this:

मुंबई, 31 मे : सलमान खान आणि कतरिना कैफ 2009मध्ये एकमेकांपासून वेगळे झाले. त्याअगोदर ते दोघंही जवळापास 4 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. पण ब्रेकअपनंतर त्यांची मैत्री मात्र संपली नाही. त्यांचं मैत्रीचं खास नात आजही कायम आहे. सध्या हे दोघंही त्यांचा आगामी सिनेमा 'भारत'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण याठिकाणीही सलमान कतरिनाची फिरकी घेण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही.

काही दिवसांपूर्वीच कतरिना आणि सलमाननं 'भारत'च्या प्रमोशनसाठी 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली. या शोमध्ये कतरिनानं तिच्या डाएट प्लान आणि एक्सरसाइझ रूटीन विषयी सांगितलं. यावेळी अर्चना सिंह पूरनने सांगितलं, की प्रियदर्शनचा सिनेमा 'दे दना दन'साठी कतरिनानं स्मूदी खाणं सोडलं होतं. यावर सलमान म्हणाला, तिनं स्मूदी खाणंच काय मलाही सोडून दिलं होतं.

ब्रेकअपनंतरही कतरिना आणि सलमान एकमेकांसाठी खूप खास आहेत. ते एकमेकांना कुटुंबाप्रमाणे मानतात. 2017मध्ये आलेल्या 'टायगर जिंदा हैं' नंतर आता भारतमध्ये सलमान आणि कतरिना एकत्र आले आहेत. हा सिनेमा येत्या 5 जूनला ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात सलमान खान, कतरिना कैफ, दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ, तब्बू, सुनील ग्रोवर आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत.

First published: May 31, 2019, 10:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading