ज्यांना पाकिस्तानशी युद्ध करायचंय त्यांनी सीमेवर जावं - सलमान खान

दबंग खान सलमान खानने ट्युबलाईट या युध्दाच्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या सिनेमाचं प्रमोशन नुकतंच केलं. प्रमोशन करताना युध्द अजिबात नको ते देशासाठी चांगलं नाही असं रोखठोख मत त्याने व्यक्त केलंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2017 04:43 PM IST

ज्यांना पाकिस्तानशी युद्ध करायचंय त्यांनी सीमेवर जावं - सलमान खान

14 जून :  'युद्धामुळे कुणाचंच भलं होत नाही . ज्यांच्या घरातली माणसं मरतात ते हताश होतात. ज्यांना पाकिस्तानशी युद्ध करायची इच्छा आहे त्यांनी सीमेवर जावं.' हे उद्गार आहेत अभिनेता सलमान खानचे. दबंग खान सलमान खानने ट्युबलाईट या युध्दाच्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या सिनेमाचं प्रमोशन नुकतंच केलं. प्रमोशन  करताना युध्द अजिबात नको  ते देशासाठी चांगलं नाही असं रोखठोख मत त्याने व्यक्त  केलंय.

खरं तर हे प्रमोशन खूपच रोचक ठरलं. या प्रमोशनला सलमान बींग ह्युमनच्या सायकलवर आला आणि  तो रिक्षाने परत गेला .ट्युबलाईट हा सिनेमा भारत चीनच्या युध्दाच्या पार्श्वभूमीवर बेतलाय. या सिनेमात युध्दात हरवलेल्या आपल्या  भावाला  शोधण्यास सलमान सीमेवर जातो.

भारत पाकिस्तान युध्दाबद्दल बोलताना सलमान म्हणाला , 'युद्धामुळे कुणाचंच भलं होत नाही. युद्धात दोन्ही देशांचे सैनिक मरतात. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती फारच वाईट होते.'

ट्युबलाईट सिनेमाची कथाही काहीशी अशीच आहे. युद्धामुळे दोन भाऊ दुरावतात आणि सलमान आपल्या भावाला शोधायला बाहेर पडतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2017 04:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...