VIDEO- ‘तिने गोड खाणंच नाही तर मलाही रिजेक्ट केलंय’, सलमानने सांगितलं त्याच्या मनातलं दुःख

VIDEO- ‘तिने गोड खाणंच नाही तर मलाही रिजेक्ट केलंय’, सलमानने सांगितलं त्याच्या मनातलं दुःख

सलमान किती हजरजबाबी आहे हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. त्यातही कपिलच्या शोमध्ये तो फारच मनमोकळ्या गप्पा मारताना दिसतो.

  • Share this:

मुंबई, 28 मे- कपिल शर्मा शोमध्ये यावेळी प्रेक्षकांना पैसा वसूल मनोरंजन मिळणार यात काही शंका नाही. कारण यावेळी शोमध्ये खुद्द सलमान खान आणि कतरिना कैफ त्यांच्या ‘भारत’ सिनेमाच्या प्रमोशनला येणार आहेत. सलमान किती हजरजबाबी आहे हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. त्यातही कपिलच्या शोमध्ये तो फारच मनमोकळ्या गप्पा मारताना दिसतो.

कपिलने २७ मे रोजी शोचा एक प्रोमो शेअर केला. यात येणाऱ्या शोमधले काही भन्नाट किस्से दाखवण्यात आले. यात सलमान कधी कपिलला श्वास सोडायला सांगतो तर कधी कतरिनाने त्याला नकार दिल्याचीही कबुली देतो. सलमानने शोची सुरुवात स्लो मोशन गाण्यावर बाइक राइड करत केली. यानंतर कतरिनाही स्टेजवर येते. दोघांचं स्वागत केल्यानंतर कपिल कतरिनाला तिच्यासाठी एक दुःखद बातमी असल्याचं सांगतो.

कपिल कतरिनाला म्हणतो की, त्याचं लग्न आता झालं आहे. कपिलच्या या वक्तव्यावर काही न बोलता ती म्हणते की, ‘तू आधीपेक्षा जास्त फिट दिसतोस.’ कतरिनाकडून स्वतःचं कौतुक ऐकल्यानंतर कपिलला फार आनंद होतो. पण तेवढ्या सलमान त्याला रोखून धरलेला श्वास सोडायला सांगतो. सलमानच्या या वाक्यावर सारेच हसायला लागतात.

दरम्यान, दे दना दन सिनेमाच्या चित्रीकरणावेळचा एक किस्सा अर्चना पुरण सिंग सगळ्यांसोबत शेअर करते. यावेळी अर्चना म्हणते की, ‘कतरिना इतकं कडक डाएट फॉलो करते की चित्रीकरणादरम्यान तिने स्मूदी खायलाही नकार दिला होता.’ यावर सलमान म्हणतो की, ‘तुम्ही स्मूदीचं काय बोलताय तिने तर मलाही नकार दिला.’ सलमानच्या या वक्तव्यावर अनेकांनी टाळ्या वाजवल्या.

थरारक VIDEO : हजारोंच्या गर्दीत अचानक माजलेला वळू घुसला आणि...

First published: May 28, 2019, 10:01 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading