सलमानचा 'राधे' सिनेमा जानेवारीत होणार होता रीलिज; या कारणामुळे पुढे ढकलली तारीख

सलमानचा 'राधे' सिनेमा जानेवारीत होणार होता रीलिज; या कारणामुळे पुढे ढकलली तारीख

राधे(Radhe) सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. सलमान खान (Salman Khan)ने या सिनेमाबद्दल स्वत: माहिती दिली. सल्लूच्या चाहत्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे राधेची रीलिज डेट जवळ जवळ पक्की झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 ऑक्टोबर: बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan)ने राधे: यूअर मोस्ट वॉटेंड भाई (Radhe: Your Most Wanted Bhai) या सिनेमाचं मोस्ट अवेटेड सिनेमाचं शूट पूर्ण केलं आहे. सलमानने आपल्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्याने शूट पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. सलमानच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. ‘राधे’ची रीलिज डेटही पक्की झाली आहे.

राधे रीलिज कधी होणार?

राधे सिनेमा पुढच्या वर्षी ईदीच्या दिवशी रीलिज होणार असल्याची माहिती मिळत आहे. म्हणजेच, 12 मे 2021 रोजी राधे सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच राधे सिनेमाच्या रीलिज डेटबाबत एक बैठक झाली होती. या बैठकीला प्रभूदेवा (prabhu deva), सोहेल खान (sohail khan), सलमान खानही उपस्थित होते. राधे सिनेमा 26 जानेवारी 2021 रोजी रीलिज करण्याचा प्रयत्न होता. पण कोनोनामुळे प्रेक्षकांचा सिनेमा थिएटरकडे ओढा काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे फिल्मची रीलिज डेट पुढची ठरवण्यात आली आहे.

सल्लूमियाच्या या सिनेमामध्ये प्रेक्षकांना अनेक अ‍ॅक्शन सिक्वेन्स बघायला मिळणार आहेत. हे सगळे अ‍ॅक्शन सीन  दक्षिण कोरियाचा स्टंटमॅन क्वोन ताए-हो याने डिझाईन केले आहेत. क्वोन ताए-हो यांना दक्षिण कोरियाचा सर्वात जबरदस्त स्टंटमॅन मानलं जातं. क्वोन ताए-हो गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये भारतामध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी सर्व अ‍ॅक्शन सिक्वेन्स डिझाईन करुन घेतले.

राधे सिनेमामध्ये सलमान खानसोबतच दिशा पटाणी (disha patani), जॅकी श्रॉफ (jackie shroff), रणदीप हुडा (randeep hooda) यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रभूदेवा आणि सोहेल खान यांनी केलं आहे. तर अतुल अग्निहोत्री या सिनेमाचा निर्माता आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 22, 2020, 3:05 PM IST

ताज्या बातम्या