सलमान खान देशातला सगळ्यात श्रीमंत सेलिब्रिटी;232 कोटीची संपत्ती

सलमान खान देशातला सगळ्यात श्रीमंत सेलिब्रिटी;232 कोटीची संपत्ती

जगातलं सगळ्यात प्रसिद्ध मासिक फोर्ब्जनं श्रीमंत सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. जगात सर्वात श्रीमंत कोण याकडे सगळ्या व्यावसायिकांच लक्ष लागलेलं असतं.

  • Share this:

22 डिसेंबर: जगात सर्वात श्रीमंत कोण आणि सेलिब्रिटींमध्ये श्रीमंत कोण ही उत्सुकता तर सर्वांनाच असते. नुकतीच फोर्ब्ज या जगातील सर्वाधिक लोकप्रिय मासिकानं दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतातल्या श्रीमंत सेलिब्रिटींची यादी प्रसिद्ध केलीय. यावर्षीही सलमान खानने या यादीत अव्वल स्थान पटकावलंय.

जगातलं सगळ्यात प्रसिद्ध मासिक फोर्ब्जनं श्रीमंत सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. जगात सर्वात श्रीमंत कोण याकडे सगळ्या व्यावसायिकांच लक्ष लागलेलं असतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतातल्या श्रीमंत सेलिब्रिटींची नावं या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं या यादीत अव्वल स्थान पटकावलंय. त्यानंतर शाहरुख खान, विराट कोहली, अक्षय कुमार, यांची नावं असून पहिल्या दहा श्रीमंत सेलिब्रिटींमध्ये प्रियांका चोप्रा या एकमेव महिलेचा समावेश आहे.

या यादीतही आपण श्रीमंतीत टायगर असल्याचं सलमान खाननं सिद्ध केलं आहे.

2017 मधील श्रीमंतांच्या फोर्ब्ज मासिकाचा अहवाल

01. सलमान खान

संपत्ती - 232 कोटी 83 लाख

02. शाहरूख खान

संपत्ती - 170 कोटी 50 लाख

03. विराट कोहली

संपत्ती - 100 कोटी 72 लाख

04. अक्षय कुमार

संपत्ती - 98 कोटी 25 लाख

05. सचिन तेंडुलकर

संपत्ती - 82 कोटी 50 लाख

 

06. आमिर खान

संपत्ती - 68 कोटी 75 लाख

07. प्रियंका चोप्रा

संपत्ती - 68 कोटी

 

08. महेंद्रसिंग धोनी

संपत्ती - 63 कोटी 77 लाख

09. हृतिक रोशन

संपत्ती - 63 कोटी 12 लाख रुपये

10 . रणवीर सिंग

संपत्ती - 62 कोटी 63 लाख रुपये

 

 

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 22, 2017 11:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading