पंतप्रधानांनी सलमान खानला केलं होतं 'हे' खास अपील, भाईजानने असं दिलं उत्तर

पंतप्रधानांनी सलमान खानला केलं होतं 'हे' खास अपील, भाईजानने असं दिलं उत्तर

यंदा निवडणुका या 11 एप्रिलला सुरू होणार आहेत तर 19 मे रोजी त्या 7 टप्प्यांमध्ये संपणार आहेत. त्यामुळे यात देशातल्या प्रत्येक नागरिकाने भाग घेत मतदान करावं असं अपील करण्यात येत आहे.

  • Share this:

मुंबई, 22 मार्च : निवडणूक आयोगाने 17व्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर संपूर्ण देशात चौफेर निवडणुकांचे रंग पाहायला मिळत आहेत. तारखा जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्व दिग्गजांना 'लोकांनी मतदान करावं यासाठी तुम्ही त्यांना प्रेरित करा' असं अपील करत आहेत. यासाठी त्यांनी प्रसिद्ध अभिनेता सलमान खान आणि अभिनेता आमिर खान यांनाही अपील केलं आहे.

मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सलमान खान आणि आमिर खान यांना टॅग करत त्यांनी लोकांना निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रेरित करावं असं अपील केलं आहे. यंदा निवडणुका या 11 एप्रिलला सुरू होणार आहेत तर 19 मे रोजी त्या 7 टप्प्यांमध्ये संपणार आहेत. त्यामुळे यात देशातल्या प्रत्येक नागरिकाने भाग घेत मतदान करावं असं अपील करण्यात येत आहे.

12 मार्च रोजी मोदींनी सलमान खान आणि आमिर खानला ट्वीट केलं होतं. त्याचदिवशी आमिर खानने त्यांच्या ट्वीटला उत्तर दिलं होतं. तर होळीचा मुहूर्त साधत सलमान खान यानेही मोदींच्या ट्वीटला उत्तर दिलं आहे.

सलमान खान यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'आपण सर्वजण लोकशाहीमध्ये राहतो. त्यामुळे मतदान करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. मी प्रत्येक मतदाराला सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या मताधिकाराचा वापर करा आणि योग्य सरकार निवडण्यामध्ये सहभागी व्हा. '

First published: March 22, 2019, 8:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading