'या' कारणासाठी सलमान खानला जावं लागलं होतं वर्गातून बाहेर

नुकत्याच एका प्रमोशन इव्हेंटमध्ये सलमाननं आपल्या बालपणीच्या आठवणी चाहत्यांशी शेअर केल्या.

News18 Lokmat | Updated On: May 30, 2019 01:51 PM IST

'या' कारणासाठी सलमान खानला जावं लागलं होतं वर्गातून बाहेर

मुंबई, 30 मे : अभिनेत्री कतरिना कैफ आणि सलमान खान सध्या त्यांचा आगामी सिनेमा भारतच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या प्रमोशन दरम्यान कतरिनाची मस्करी करण्याची एकही संधी सलमान खान सोडत नाही. काही दिवसांपूर्वी एका प्रमोशन इव्हेंटमध्ये सलमानने कतरिनानं त्याला भाईजान म्हणू नये असं सांगितलं होतं. त्यानंतर आता नुकत्याच झालेल्या एका प्रमोशन इव्हेंटमध्ये सलमाननं आपल्या बालपणीच्या आठवणी चाहत्यांशी शेअर केल्या.

आगामी सिनेमा भारतच्या प्रमोशनसाठी सलमाननं नुकतीच द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यानं आपल्या लहानपणीचे काही किस्से या ठिकाणी शेअर केले. सलमान म्हणला, 'एकदा मला क्लासमधून बाहेर काढण्यात आलं होतं आणि त्याचवेळी माझे बाबा तिथून जात होते. त्यांनी मला विचारलं असं काय केलंस ज्यामुळे तुला क्लासमधून बाहेर काढण्यात आलं. त्यावेळी मला स्वतःलाही माहीत नव्हतं की मला क्लासमधून का बाहेर काढण्यात आलं आहे. मी म्हणालो, माहीत नाही.'

सारा अली खान नाही तर 'या' अभिनेत्रीला कार्तिक आर्यनची पहिली पसंती

सलमान पुढे म्हणाला, 'बाबांना नंतर समजलं की, माझी शाळेची फी वेळेत दिलेली नाही. त्यामुळे मला क्लासमधून बाहेर काढण्यात आलं आहे. त्यांनी दुसऱ्याच दिवशी माझी फी दिली आणि त्यानंतर माझ्या टीचरनी त्यांची माफीही मागितली.'


Loading...सलमानचा भारत हा सिनेमा येत्या 5 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाकडून प्रेक्षकांसोबतच सलमान आणि कतरिनालाही खूप अपेक्षा आहेत. सलमाननं तर या सिनेमासाठी कतरिनाला राष्ट्रीय पुरस्कार मिळेल असंही म्हटलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बस जफर यांचं असून सलमान आणि कतरिनासोबतच तब्बू, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोव्हर आणि दिशा पाटनी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

'या' व्यक्तीमुळे अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाला होतोय उशीर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 01:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...