VIDEO : कतरिनाशी फ्लर्ट करू लागला विकी कौशल, भाईजाननं दिली जबरदस्त रिअ‍ॅक्शन

VIDEO : कतरिनाशी फ्लर्ट करू लागला विकी कौशल, भाईजाननं दिली जबरदस्त रिअ‍ॅक्शन

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात सलमानच्या समोरच विकी कौशल सलमानची एक्स गर्लफ्रेंड कतरिनासोबत फ्लर्ट करताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 08 एप्रिल : बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या दबंग अंदाजासाठी ओळखला जातो. तो नेहमीच त्याला वाटेल ती गोष्ट त्याला वाटेल तेव्हा करतो. तो कोणतीही गोष्ट फार विचार करुन बोलत नाही. ज्या ठिकाणी त्याला जे योग्य वाटतं ते तो त्यावेळी करतो. त्याच्या याच गोष्टीमुळे तो आजकाल पुन्हा चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात सलमानच्या समोरच विकी कौशल सलमानची एक्स गर्लफ्रेंड कतरिनासोबत फ्लर्ट करताना दिसत आहे आणि हे पाहिल्यावर सलमान खान अशी रिअ‍ॅक्शन देतो की त्याच्या याच रिअ‍ॅक्शनमुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मागच्या काही दिवसांपासून विकी कौशल आणि कतरिना कैफ एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. अशात विकी आणि कतरिनाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ एका अवॉर्ड फंक्शनमधील आहे. ज्यात विकी कतरिनाला म्हणतो, तू एखाद्या विकी कौशलला बघून लग्न का नाही करुन टाकत. लग्नाचा सीझन सुरू आहे तर मी तुला विचारतो की, माझ्याशी लग्न करशील का?

विकीला असं फ्लर्ट करताना पाहून सलमानला सुद्धा हसू आवरत नाही. विकीचं बोलणं ऐकून तो बाजूला बसलेल्या अर्पिता खानच्या खांद्यावर डोकं ठेऊन झोपण्याचं नाटक करतो. सलमानचा हा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

There's a bromance brewing next week on #KoffeeWithKaran with @ayushmannk and @vickykaushal09. #KoffeeWithVicky #KoffeeWithAyushmann

A post shared by Star World (@starworldindia) on

मागच्या काही काळापासून विकी आणि कतरिना एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. अर्थात या दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मागच्या वर्षी कॉफी विथ करणमध्ये विकीसोबत सिल्व्हर स्क्रिन शेअर करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. सध्या कतरिनाच्या सूर्यवंशी सिनेमाचं प्रदर्शन रखडलं आहे. विकीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तो शेवटचा भूत सिनेमात दिसला होता.

अन्य बातम्या

दोन्ही लेकी कोरोना पॉझिटिव्ह, मुलींनतर बॉलिवूडचा निर्माता COVID-19 च्या विळख्यात

सलमाननंतर वरुण धवन आला पुढे, डॉक्टर आणि मेडिकल स्टाफसाठी केली मोलाची मदत

COVID-19 : इटली भारताचा भविष्यकाळ? मुक्त बर्वेने शेअर केला थरकाप उडवणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2020 06:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading