Cannes 2019 : हिना खान ड्रेसवरून ट्रोल झाल्यावर भडकला सलमान खान

Cannes 2019 : हिना खान ड्रेसवरून ट्रोल झाल्यावर भडकला सलमान खान

हिनाच्या 'कान लुक'वर मासिक एडिटर जितेश पिल्लई यांनी टीका केली होती ज्यावरून एक नवा वाद निर्माण झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 17 मे : कान 2019मध्ये टीव्ही अभिनेत्री हिना खान डेब्यू केला. त्यानंतर तिच्या लुकचं सगळीकडूनच खूप कौतुक झालं. ज्या आत्मविश्वासानं तिनं रेड कार्पेटवर एंट्री केली. ते पाहता ती खरोखरच कौतुकास पात्र आहे. मात्र नुकताच तिच्या लुकवर वादही सुरू झाला आहे. हिनाच्या 'कान लुक'वर मासिक एडिटर जितेश पिल्लई यांनी हिनाच्या लुकवर टीका केली होती ज्यावरून एक नवा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर आता या वादावर अभिनेता सलमान खाननंही प्रतिक्रिया दिली आहे.

'फिल्मफेअर' मासिकाचे एडिटर जितेश पिल्लई यांनी हिना खानच्या कान लुकवर, 'अचानक कान्स चांदिवली स्टुडिओ बनला का ?' अशी कमेंट केली होती. यावर हिना खानसहित अनेक टीव्ही कलाकारांनी नारजी व्यक्त केली. सलमान सध्या त्याचा आगामी सिनेमा 'भारत'च्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. या प्रमोशन दरम्यान सलमानला हिनाच्या लुकवरून सुरू असलेल्या वादाविषयी प्रश्न विचारण्यात आला. सलमानला या संपूर्ण प्रकरणाची काहीही माहिती नव्हती मात्र त्याला सर्व प्रकार सांगितल्यावर त्यानं यावर उपरोधिक प्रतिक्रिया दिली. सलमान म्हणाला, 'एका एडिटरसाठी ही एक जबाबदारीपूर्वक प्रतिक्रिया आहे. त्यांची ही प्रतिक्रिया पूर्णपणे समजदारपणे केलेली आहे. त्यामुळे मला स्वतःलाच समजत नाही की त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे.'

याआधी हिनानं सोशल मीडियावर झालेल्या या प्रकारावर आपली प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, 'मी खूप खंबीर आहे आमि नेहमीच मी अशीच राहणार आहे. मला माहीत नाही मी कुठून आले आहे आणि मला हे जाणूनही घ्यायचं नाही. कृपाया कोणत्याही जागेच्या आधारावर माझी योग्यता ठरवू नका. नेहमीप्रमाणे मी पुढेही अशीच खूप मेहनत करत राहीन आणि स्वतःच्या हिंमतीवर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करेन.'

 

View this post on Instagram

 

Day 3 @festivaldecannes

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

याशिवाय कंगना रनौतची बहीण रंगोली चंडेलनंही ट्वीट करत हिनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. रंगोलीनं लिहिलं, 'या माणसाकडे पाहा, ती अभिनेत्री आपल्या मेहनतीनं कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहचली आहे. ती आपल्या सिनेमाचं प्रतिनिधित्व करत आहे. मात्र हे जितेश पिल्लई मौसीजी तिच्यावर टीका करत आहेत. का तर ती एक आउटसाइडर आहे. हे सर्व मूव्ही माफिया आहे आणि अशाच लोकांशी कंगनाही लढत आहे.'

हिनानं कान्सच्या रेड कार्पेटवर धमाकेदार एंट्री घेतली होती. यावेळी तिनं Zaid Nakadने डिझाइन केलेला सिल्व्हर शिमरी गाऊन परिधान केला होता. कमीत कमी मेकअप, न्यूड लिपस्टिक आणि सिंपल हेअर स्टाइलमध्ये ती खूपच स्टनिंग दिसत होती.

Cannes 2019 - दीपिका पदुकोणच्या 'या' टॉपचीच सगळीकडे चर्चा, तुम्ही पाहिलात का तिचा हा लुक

...म्हणून 'वर्ल्ड बुक ऑफ लंडन'मध्ये कॉमेडियन कपिल शर्माच्या नावाची नोंद

First published: May 17, 2019, 7:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading