मुंबई 17 मार्च: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ (Radhe) असं आहे. हा चित्रपट येत्या 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. लक्षवेधी बाब म्हणजे त्याच दिवशी अॅक्शनस्टार जॉन अब्राहमचा (John Abraham) ‘सत्यमेव जयते 2’ (Satyameva Jayate 2) हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच ईदच्या निमित्तानं दोन सुपरस्टार एकमेकांना आव्हान देताना दिसतील.
कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळं सिनेसृष्टीला जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे. परिणामी अनेक मोठे चित्रपट सिनेमागृहांऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित केले गेले. मात्र काही कलाकार असेही ज्यांनी आपल्या चित्रपटांना ओटीटीवर प्रदर्शित करण्यास नकार दिला. त्यामुळं सिनेसमागृहांच्या तारखांमध्ये एकच गोंधळ पाहायला मिळत आहे. अन् त्यापैकी एक उदाहरण म्हणजे सलमानचा राधे आणि जॉनचा सत्यमेव जयते 2 हे चित्रपट. हे दोन्ही चित्रपट 13 मे रोजी ईदच्या निमित्तानं प्रदर्शित होणार आहेत. म्हणजेच एकाच दिवशी बॉलिवूडमधील दोन मोठ्या कलाकारांची बॉक्स ऑफिस लढाई पाहायला मिळेल. आता प्रेक्षक कुठल्या चित्रपटाला अधिक प्रतिसाद देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
अवश्य पाहा - ‘गटबाजीत पडू नका काम करा अन् पैसे घ्या’; राजपाल यादवनं केली बॉलिवूडची पोलखोल
‘मोस्ट वाँटेड भाई राधे’ हा सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. दोन वर्षांपूर्वी सलमाननं या चित्रपटाची घोषणा केली. हा २००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘वाँटेड’ या चित्रपटाचा सिक्वेल असल्याचे म्हटले जात आहे. अर्थात याबद्दल अद्याप कुठंलही अधिकृत स्पष्टीकरण सलमाननं दिलेलं नाही. दुसरीकडे सत्यमेव जयते हा चित्रपटाच्या ट्रेलरनं देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतल आहे. या चित्रपटात जॉन डबलरोल साकारणार आहे. त्यामुळं या चित्रपटाबाबतही प्रेक्षक उत्सुक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, John abraham, Salman khan, Upcoming movie