सलमान खानची मागणी भन्साळींना नामंजूर, ‘इन्शाअल्लाह’मधून दबंगचं बॅकआउट?

सलमान खानची मागणी भन्साळींना नामंजूर, ‘इन्शाअल्लाह’मधून दबंगचं बॅकआउट?

सलमाननं या सिनेमातून अचानक माघार घेतल्यानं सिनेमावरून या दोघांमध्ये वाद झाल्याचं बोललं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 27 ऑगस्ट : सलमान खान आणि आलिया भट यांचा सिनेमा इन्शाअल्लाह मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. सलमान आणि आलिया सिल्व्हर स्क्रिनवर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे त्यांचे चाहते या सिनेमाबाबत खूपच उत्सुक होते मात्र आता या सिनेमाबाबत एक निराशजनक वृत्त समोर आलं आहे. अभिनेता सलमान खाननं या सिनेमातून माघार घेतल्याचं बोललं जात आहे. ज्यामुळे सलमान आणि आलियाचे चाहते नाराज झाले आहेत. या सिनेमातून भन्साळी आणि सलमान तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र काम करणार होते मात्र आता सलमाननं या सिनेमातून अचानक माघार घेतल्यानं सिनेमावरून या दोघांमध्ये वाद झाल्याचं बोललं जात आहे.

‘स्पॉटबॉयई’नं दिलेल्या वृत्तानुसार सलमान खाननं संजय लीला भन्साळी यांच्या ‘इन्शाअल्लाह’ सिनेमातून तडका-फडकी माघार घेतली आहे. या सिनेमाच्या शूटिंगला काही दिवस बाकी असतानाच सलमाननं अशाप्रकारे सिनेमा सोडल्यानं त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार सलमाननं भन्साळींचा सिनेमा ‘इन्शाअल्लाह’ला 125 दिवस देण्याचं वचन दिलं होतं. यासोबतचं हा सिनेमा ईदच्या दिवशी रिलीज व्हावा असं सलमानला वाटत होतं. मात्र भन्साळींनी सलमानची ही मागणी मान्य केली नाही. कारण त्यांच्या मते या सिनेमाचं शूट पूर्ण होण्यासाठी 8 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होणं शक्य नाही.

'गद्दारी तो आपने सिखाई नहीं', पाहा ऋतिक-टायगरचा अ‍ॅक्शनपॅक War Trailer

 

View this post on Instagram

 

Work in progress...

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

भन्साळींनी ईदच्या मुहूर्तावर सिनेमा रिलीज करण्यास नकार दिल्याची गोष्ट सलमानला आवडली नाही. त्यामुळे त्यानं हा सिनेमा करण्यास नकार दिल्याचं बोललं जात आहे. मात्र सिनेमा सोडताना, हा सिनेमा सोडण्याचं कारण हे सिनेमाची रिलीज डेट नसून त्यानं इतर सिनेमांसाठीही डेट दिलेल्या असल्यानं इन्शाअल्लाहसाठी 125 जास्त दिवस देणं शक्य नाही असं स्पष्टीकरण सलमाननं भन्साळींना दिलं असल्याचं बोललं जात आहे.

KBC 11 : चरणा गुप्ता यांना 1 कोटींच्या प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायात चूक

 

View this post on Instagram

 

Berry funny 🍓😋🙃

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

याशिवाय अशीहही चर्चा आहे की, सलमान या सिनेमामध्ये मर्यादेपेक्षा जास्त हस्तक्षेप करत होता. जे भन्साळींना आवडत नव्हतं. त्यामुळेच त्यांनी इन्शाअल्लाह तयार न करण्याचा निर्णय घेतला. भन्साळी त्याचे कलाकार आणि कलाकारांच्या सल्ल्याचा आदर करतात मात्र जर कोणी त्या सिनेमाची कथाच बदलून टाकत असेल तर हे त्यांना आवडत नाही. त्यामुळे त्यांनी हा सिनेमा तयार न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सलमान आणि भन्साळींच्या मैत्री फुट पडलेली नाही.

स्टेशनवर गाणाऱ्या रानू यांना हिमेश रेशमियाने पहिल्याच गाण्यासाठी दिली एवढी रक्कम

 

View this post on Instagram

 

🌻

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

यानंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमाननं, माझ्यात आणि संजयमध्ये कोणताच वाद नाही. त्याला जो सिनेमा तायार करायचा आहे तो त्यानी करावा. मी त्याला खूप पूर्वीपासून ओळखतो आणि तो आपल्या सिनेमाबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड करत नसल्याचं सांगितलं. तसेच भन्साळींना त्यांच्या आगामी सिनेमासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

======================================================================

मम्मी के बच्चे प्यारे प्यारे! वैतागलेल्या आईला असं समजावतोय पोपट; पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 12:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading