OMG! सिनेमाच्या शूटिंगमुळे नाही तर या आजारामुळे सलमान सोडतोय बिग बॉस

OMG! सिनेमाच्या शूटिंगमुळे नाही तर या आजारामुळे सलमान सोडतोय बिग बॉस

बिग बॉसचा होस्ट म्हणून सलमानचा हा शेवटचा सीझन असणार आहे.

  • Share this:

मुंबई, 11 डिसेंबर : बिग बॉसचे जवळपास 10 सीझन होस्ट करणारा सलमान खान आता या शोचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. सलमान खानशिवाय या शोचा आपण विचारही करु शकत नाही. काही दिवसांपूर्वीच या शोच्या मेकर्सनी यंदाच्या सीझनचा कालावधी वाढवला असून हा शो आता आणखी 5 आठवडे चालणार आहे. पण या सीझनच्या पुढच्या एपिसोडमध्ये सलमान खान होस्टिंग करणार नाही अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान उर्वरित एपिसोडचं होस्टिंग फराह खान करणार असल्याचंही बोललं जात आहे.

सलमान खान त्याच्या सिनेमाच्या डेटमुळे हा शो सोडत आहे असा अंदाज लावला जात होता मात्र सलमाननं हा शो सोडण्यामागे काही वेगळंच कारण असल्याचं बोललं जात आहे. सलमान बिग बॉसचं होस्टिंग सिनेमांच्या डेटमुळे नाही तर त्याच्या तब्येतीमुळे सोडत आहे. डेक्कन क्रॉनिकलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या शोच्या होस्टिंग दरम्यान सलमानला प्रचंड ताण येत असून सोबतच त्याच्या आगमी सिनेमांचं शूटिंगही बाकी आहे. त्यामुळे सलमानच्या कुटुंबीयांना वाटतं की त्यानं जास्त ताण घेऊ नये.

True Gentleman पत्नी गौरीचा गाउन सांभाळताना दिसला शाहरुख खान VIDEO VIRAL

सलमान मागच्या काही काळापासून 'ट्रिजेमिनल न्‍यूरेलजिया' (Trigeminal Neuralgia ) या आजाराचा सामना करत आहे. त्यामुळे सलमाननं जास्त ताण घेणं त्याच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. मागच्या काही आठवड्यांपासून ‘विकेंड का वार’मध्ये सलमान नेहमीच रागवलेला आणि तणावाखाली असलेला दिसतो. मागच्या आठवड्यात अरहान खोटं बोलल्यानं सलमान एवढा रागावला होता की त्यानं रागात स्वतःचं जॅकेट सुद्धा फेकून दिलं होतं.

बिग बॉसचा होस्ट म्हणून सलमानचा हा शेवटचा सीझन असणार आहे. मागच्या काही सीझन्सपासूनच सलमानला हा शो सोडायचा आहे मात्र प्रत्येकवेळी मेकर्स काही ना काही करुन त्याला हा शो करण्यास तयार करतात. पण आता सलमानचे कुटुंबीय त्याच्या तब्येतीमुळे चिंतेत आहेत. हा बिग बॉसचा 13 सीझन सुरू आहे आणि सलमाननं या शोचे 10 सीझन होस्ट केले आहेत. या शोचा पहिला सीझन अरशद वारसीनं होस्ट केला होता.

…आणि कार्यक्रमात ढसाढसा रडायला लागली दीपिका पदुकोण, VIDEO VIRAL

अंगावर शहारे आणणारा 'छपाक', मन हेलावणारा दीपिका पदुकोणचा अभिनय

Published by: Megha Jethe
First published: December 11, 2019, 11:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading