Home /News /entertainment /

भाईजान सलमानसह परीक्षेत पास होण्यासाठी सोहेल-अरबाज करायचे जुगाड, वडिलांनी केला मोठा खुलासा

भाईजान सलमानसह परीक्षेत पास होण्यासाठी सोहेल-अरबाज करायचे जुगाड, वडिलांनी केला मोठा खुलासा

salman khan

salman khan

बॉलिवूडचा 'भाईजान' अशी ओळख असलेल्या अभिनेता सलमान खान (Salman Khan) या ना त्या कारणाने सतत चर्चेत असतो. दरम्यान, त्याचे वडिल सलिम खान (Salim Khan) यांनी सलमानसंदर्भात एक मोठा खुलासा केला आहे.

    मुंबई, 7 मार्च: बॉलिवूडचा 'भाईजान' अशी ओळख असलेल्या अभिनेता सलमान खान (Salman Khan) या ना त्या कारणाने सतत चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या लग्नामुळे चर्चेत होता. दरम्यान, त्याचे वडिल सलिम खान (Salim Khan) यांनी सलमानसंदर्भात एक मोठा खुलासा केला आहे. ज्यामध्ये त्याची पोलखाल झाली आहे. सलिम खान यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ द कपिल शर्मा शो सिजन 2 मधील आहे. दोन वर्षापूर्वी, सलमान खान आणि त्याचे वडिल सलिम खान , भाऊ सोहैल खान (Sohail Khan), अरबाज (Arbaaz Khan)सह द कपिल शर्मा शो सिजन 2 मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी वडील सलिम यांनी तिघांच्या शालेय जीवनातील किस्सा शेअर करत धक्कादायक खुलासा केला होता. वांद्रे येथील स्टॅनिस्लॉस हायस्कूल, मध्ये सलमान सह त्याचे दोन भाऊ अरबाज आणि सोहेल यांनी शिक्षण घेतले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र, त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण अर्ध्यातच सोडले. तिघांच्या शिक्षणावर त्यांचे वडिल सलिम यांनी भाष्य करत द कपिल शर्मा शोमध्ये मजेशीर खुलासा केला आहे. ते म्हणाले, सलमान, अरबाज आणि सोहेल लहानपणी लीक झालेला पेपर आणणाऱ्या व्यक्तीची काळजी घेत असत. विशेषतः सलमान घरात शिरताच त्याच्यासमोर घिरट्या घालायचा. असा खुलासा वडिल सलिम यांनी यावेळी केला होता. तसेच त्यांनी असे अनेक किस्से शेअर केल्या ज्यामुळे शोमध्ये एकच हशा पिकला. सलमानबद्दल एक गोष्ट जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, लहानपणी सलमानला हिरो नव्हे तर वडील सलीम यांच्यासारखे लेखक व्हायचे होते. सल्लू मियाँ लहानपणापासूनच पोहण्यात निपुण असून शाळेच्या काळातही तो चॅम्पियन राहिला आहे. सलमान खानने 1988 सालापासून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती आणि त्याचा पहिला चित्रपट 'बीवी हो तो ऐसी' होता. काही दिवसांपूर्वी सलमान खानचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात तो सोनाक्षी सिन्हाला वधूप्रमाणे अंगठी घालताना दिसला होता. मात्र, हा फोटो फेक निघाला. अनेकांनातर हे खरेही वाटले होते. यावर सोनाक्षीनेही प्रतिक्रिया दिली होती. तिने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोवर कमेंट करताना म्हटले होते, “तुम्ही एवढे मूर्ख आहात का, की खऱ्या आणि मॉर्फ्ड फोटोतील फरकही सांगता येऊ नये."
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Entertainment, Salman khan

    पुढील बातम्या