चला, नद्यांचं संरक्षण करूया, सलमान रॅली फॉर रिव्हर'मध्ये सहभागी

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Aug 19, 2017 02:26 PM IST

चला, नद्यांचं संरक्षण करूया, सलमान रॅली फॉर रिव्हर'मध्ये सहभागी

17 ऑगस्ट: भारतातील मृत होणाऱ्या नद्यांचे संवर्धन करण्यासाठी गुरू जग्गी वासुदेवांनी रॅली फॉर रिव्हर नावाच अभूतपूर्व उपक्रम हाती घेतला आहे. भारतातील नद्यांना वाचवण्यासाठी या मोहिमेत आता सलमान खानने ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून सहभागी झाल्याचं सांगितलं आहे.

या व्हिडिओत सलमान खान नद्यांचे महत्त्व सांगतो. तसंच जर आपण या नद्यांचं पाणी पित असू तर आपण त्यांचे संरक्षण केलं पाहिजे असंही म्हणतो व्हिडिओच्या शेवटी रॅली फॉर रिव्हर्स या मोहिमेत सहभागी होण्याचं आव्हानही सलमान त्याच्या फॉलोअर्सला करतो.

Loading...

नद्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाबद्दल जनजागृती करण्यासाठी गुरू जग्गी वासुदेव हे 3 सप्टेंरपासून एक महिनाभर एक यात्रा करणार आहेत. या यात्रेत देशात ठिकठिकाणी जाऊन लोकांना नद्यांच्या रक्षणाचं महत्त्व पटवून देणार आहे. या यात्रेचं नाव रॅली फॉर रिव्हर्स असून या रॅलीत सगळ्यांना सहभागी होण्याचं आव्हान त्यांनी केलं आहे. अनेक खेळाडू, उद्योगपती, आणि सेलिब्रिटी रॅली फॉर रिव्हर्समध्ये सहभागी झाले आहेत.

आता सलमाननेही या रॅलीत आपला सहभाग नोंदवला असून त्याच्या फॅन्सलाही सहभागी होण्याचं आव्हान तो करतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2017 04:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...