सलमान भरतोय अभिनेत्याचे मेडिकल बिल्स, 'मैंने प्यार किया' मध्ये याच कलाकाराला केलं होतं रिप्लेस

सलमान भरतोय अभिनेत्याचे मेडिकल बिल्स, 'मैंने प्यार किया' मध्ये याच कलाकाराला केलं होतं रिप्लेस

अभिनेता सलमान खानने (Salman Khan) केलेल्या मदतीच्या बातम्या नेहमी चर्चेत असतात. दरम्यान सध्या देखील सलमान खान अशाच एका कारणासाठी चर्चेत आहे. फराझ खान (Faraaz Khan) या अभिनेत्याची तो दीर्घकाळापासून मदत करत आहे.

  • Share this:

मुंबई, 15 ऑक्टोबर : अभिनेता सलमान खानने (Salman Khan) केलेल्या मदतीच्या बातम्या नेहमी चर्चेत असतात. दरम्यान सध्या देखील सलमान खान अशाच एका कारणासाठी चर्चेत आहे. फराझ खान (Faraaz Khan) या अभिनेत्याची तो दीर्घकाळापासून मदत करत आहे. बेंगळुरूतील विक्रम हॉस्पिटलमध्ये हा 'मेहंदी' फेम अभिनेता उपचार घेत आहे. सलमानने त्याच्या सर्व मेडिकल बिल्सचा खर्च स्वत: देण्याचे ठरवले आहे. कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मिरा शाहने याबबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. कश्मिरा शाहने सलमानबरोबर 'दुल्हन हम ले जाएंगे' आणि 'कहीं प्यार न हो जाए' या सिनेमात काम केले आहे.

कश्मिरा शाहने या पोस्टमध्ये असं म्हटले आहे की, 'तू खरंच एक महान व्यक्तीमत्त्व आहेस. फराझ खानची काळजी घेण्यासाठी आणि त्यांचे मेडिकल बिल्स भरण्यासाठी धन्यवाद. 'फरेब' मधील फराझ खान हा अत्यंत बिकट परिस्थितीत आहे आणि सलमान ज्याप्रमाणे इतरांची मदत करतो त्याचप्रमाणे तो त्याच्या बाजूने देखील उभा राहिला आहे. मी नेहमी तुझी खरी प्रशंसक राहिली आहे आणि नेहमी असेन. जर लोकांना ही पोस्ट आवडली नाही तरी मला काही वाटणार नाही. तुमच्याकडे मला अनफॉलो करण्याचा पर्याय आहे. मी असाच विचार करते आणि हेच वाटते. हा फिल्म इंडस्टीमध्ये भेटलेला तो सर्वात Genuine माणूस आहे.'

(हे वाचा-मोठी बातमी! 12 आठवड्यांपर्यत न्यूज चॅनल्सच्या TRPला BARC कडून स्थगिती)

दरम्यान  'मैंने प्यार किया' मध्ये सलमान खानने फराझ खान या अभिनेत्यालाच रिप्लेस केले होते असल्याची माहिती दैनिक भास्करने दिली आहे.बुधवारी फराझच्या कुटुंबीयांनी एका फंडरेजर वेबसाइटच्या मदतीने त्याच्या उपचारासाठी मदत मागितली होती. 8 ऑक्टोबर रोजी त्याची तब्येत बिघडल्यामुळे फराझला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आल्याचे यामध्ये म्हटले आहे.

डॉक्टरांच्या माहितीनुसार फराझच्या मेंदूमध्ये इन्फेक्शन झाले आहे. त्याला याकरका 7 ते 10 दिवस आयसीयूमध्ये ठेवावे लागणार आहे ज्याचा खर्च जवळपास 25 लाखाचा आहे. तो दीर्घकाळापासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असल्याने ही रक्कम जमा करणेकठीण होते. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी ही मदत मागितली आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 15, 2020, 2:48 PM IST

ताज्या बातम्या