S M L

दीपिका-सलमान सिनेमात एकत्र न येण्यामागचं 'हे' आहे कारण

सलमानला एका मुलाखतीदरम्यान आतापर्यंत दीपिकासोबत काम न करण्यामागचं कारण विचारण्यात आलं. यावर सलमाननं खूपच मजेशीर उत्तर दिलं.

Updated On: Mar 28, 2019 08:58 PM IST

दीपिका-सलमान सिनेमात एकत्र न येण्यामागचं 'हे' आहे कारण

मुंबई, 28 मार्च :  दबंग सलमान खान सध्या बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. तर दुसरीकडे दीपिका पदुकोणनं बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसताना दमदार अभिनयाच्या जोरावर आपलं स्थान पक्क केलं आहे. आज तीसुद्धा बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. दीपिकानं आतापर्यंत जवळजवळ सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे. असं असलं तरीही सलमान खान आणि दीपिका एकदाही सिल्व्हर स्क्रीनवर एकत्र दिसलेले नाहीत. यामुळे दीपिका आणि सलमान दोघंही सिनेमात एकत्र काम कधी करणार? याची त्यांचे चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. सलमान आणि दीपिकाला याविषयी अनेकदा प्रश्नही विचारले जातात. काही दिवसांपूर्वीच दीपिकासोबत काम न करण्याविषयीचा प्रश्न सलमानला विचारण्यात आला. या प्रश्नाला सलमाननं अतिशय मजेशीर उत्तर दिलं.

दीपिकासंदर्भात उत्तर देताना सलमान म्हणाला की, 'दीपिका एक मोठी अभिनेत्री आहे. त्यामुळे तिच्या योग्यतेची कोणतीही मोठी स्क्रिप्ट अद्याप मिळालेली नाही. ज्यानुसार आम्ही दोघं एकत्र काम करू तसंच आम्हाला दोघांना एकत्र कास्ट करण्यासाठी कोणीच समोर आलेलं नाही'. सलमाननं थेट उत्तर देणं जरी टाळलं असलं तरीही दीपिका आणि सलमानचे चाहते मात्र त्यांना एकत्र काम करताना पाहण्यासाठी प्रचंड आतुर झाले आहेत.

सलमाननं नुकतंच त्याचा आगामी सिनेमा 'भारत'चं शूटिंग पूर्ण केलं आहे. या सिनेमासाठी सुरुवातीला दीपिकाला विचारणा करण्यात आली होती. मात्र त्याचवेळी तिचं लग्न असल्यानं तिनं काम करण्यास नकार दिला आणि तिच्या जागी कतरिना कैफला कास्ट करण्यात आलं. दीपिका लवकरच मेघना गुलजारच्या 'छपाक'मध्ये दिसणार असून या सिनेमातील तिच्या लूकची सध्या सर्वत्र चर्चा आहे. लग्नानंतर दीपिकाचा हा पहिलाच सिनेमा आहे.





Loading...

 





View this post on Instagram




 

A character that will stay with me forever...#Malti Shoot begins today!#Chhapaak Releasing-10th January, 2020. @meghnagulzar @atika.chohan @foxstarhindi @vikrantmassey87


A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on






वाचा : ...आणि आमिर खान शाहरुखच्या पार्टीतून न जेवताच परतला


पाहा : माधुरी आणि श्रीराम नेने यांची UNCUT मुलाखत; पाहा काय म्हणाल्या '15 ऑगस्ट'बाबत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 28, 2019 08:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close