ती माणसं नसून सैतान, हैदराबाद गँग रेप प्रकरणावर सलमान संतापला

ती माणसं नसून सैतान, हैदराबाद गँग रेप प्रकरणावर सलमान संतापला

"प्रियांका रेड्डीला न्याय मिळायला हवा. ज्यांनी हे कृत्य केलं ती माणसं नसून सैतान आहेत. यांच्याविरोधात लढायला आपण एकत्र यायला हवं"

  • Share this:

मुंबई, 30 नोव्हेंबर : तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका महिला डॉक्टरची सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली आहे.  या घटनेनंतर अभिनेता सलमान खाननंही ट्वीट करून संताप व्यक्त केला.

पीडितेला न्याय मिळावा म्हणून आता कलाकारही पुढे सरसावले आहेत. सोशल मीडियावरून अभिनेता सुबोध भावेनं आपला संताप व्यक्त केला. तर, सलमान खाननं अन्यायाविरोधात उभं राहण्याचं आवाहन केलं आहे.

"प्रियांका रेड्डीला न्याय मिळायला हवा. ज्यांनी हे कृत्य केलं ती माणसं नसून सैतान आहेत. यांच्याविरोधात लढायला आपण एकत्र यायला हवं. बेटी बचाओ हे फक्त कॅम्पेन पुरतं मर्यादित राहू नये. हीच वेळ आहे या अन्यायाविरोधात उभं राहण्याची." अशी भावना सलमान खानने व्यक्त केली.

घटनेचे धक्कादायक पैलू

हैदराबादच्या रस्त्यावर बुधवारी रात्री चार नराधमांनी माणुसकीची हत्या केली. एका महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर नराधमांनी सामूहिक बलात्कार केला आणि तिचा मृतदेह जाळून टाकला. गुरूवारी पहाटे, हैदराबाद-बंगळुरू महामार्गावर अर्धवट जळालेल्या मृतदेहाची पोलिसांनी पाहणी केली आणि थरकाप उडवणाऱ्या या घटनेचे एक-एक पैलू समोर आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 9.35 ते 10 वाजेच्या सुमारास सामूहिक बलात्काराची घटना घडली. सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी पीडितेचा मृतदेह ट्रकमध्ये ठेवला आणि महामार्गावर नेला.

महामार्गावर काही अंतरावर जाऊन एका पेट्रोल पंपावरुन पेट्रोल आणि डिझेल खरेदी केलं आणि त्यानंतर आरोपींनी पीडित तरुणीचा मृतदेह पेट्रोलनं पेटवून दिला.

CCTV आणि पोलीस तपासांमधून मिळालेल्या माहितीनुसार, चार आरोपींना  याप्रकरणी तेलंगण पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद, आरिफ, नवीन, चिंताकुंता केशावुलू आणि शिवा अशी या आरोपींची नावे आहेत. आरोपींची चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहे.

पीडितेचा आवाज कुणालाही ऐकायला जाऊ नये यासाठी आरोपींनी पीडितेचं तोंड दाबलं. श्वास घेऊ न शकल्यामुळे गुदमरून पीडितेचा यात मृत्यू झाला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडित तरुणीची स्कूटी टोल प्लाझामध्ये दिसतेय. आरोपींनी कट रचून सामूहिक बलात्कार केल्याचं पोलिसांनी सांगितलं. याघटनेनंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी या घटनेची माहिती घेतली.

मुक्या प्राण्यांवर उपचार करणाऱ्या तरुण डॉक्टर महिलेवर माणसानं मात्र एखाद्या दानवासारखे अत्याचार केले. माणुसकीला लागलेला हा डाग आता तिला योग्य न्याय मिळाल्यावरच पुसून निघेल.

Published by: sachin Salve
First published: November 30, 2019, 11:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading