सलमान खानच्या घरी झाली पार्टी, झिवा धोनीचा हा व्हिडिओ अजून होतोय व्हायरल

सलमान खानच्या घरी झाली पार्टी, झिवा धोनीचा हा व्हिडिओ अजून होतोय व्हायरल

सलमानच्या 'भारत'चा सेट फार दूर असल्यामुळे सलमान या पार्टीत हजर राहणार नाही असं म्हटलं जातं होतं. पण अगदी शेवटच्या क्षणी आपलं शूटिंग थांबवून सलमान आला

  • Share this:

पनवेल, ३१ मार्च- बॉलिवूडचा दबंग सलमान खान कितीही मोठा सुपरस्टार असला तरी जेव्हा गोष्ट कुटुंबाची येते तेव्हा हातातली सर्व कामं सोडून तो कुटुंबाला प्राधान्य देतो. शनिवारी रात्री असंच काहीसं पाहायला मिळालं. ३० मार्चला सलमानचा भाचा आहिलचा वाढदिवस होता. या वाढदिवसाला महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा धोनीही आली होती. सलमानचा भाऊ सोहेल खानने तिला उचलून घेत केकवरची एक मेणबत्तीही फुंकायला दिली. झिवाचा आणि सलमानचा हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सलमानचा सर्वात जास्त जीव आहिलवर आहे. त्यामुळे त्याचा बर्थडे सेलिब्रेट केल्याशिवाय तो राहणारच नाही. तो फक्त बर्थडे पार्टीत सहभागी झाला नाही तर त्याने पार्टीत रंगही भरले. आयुष शर्मा आणि अर्पिता खानचा मुलगा आहिल काल तीन वर्षांचा झाला.

सध्या सलमान त्याचा आगामी भारत सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या पार्टीत तो भारतच्या टीमलाच घेऊन आला. आहिलच्या बर्थडे पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ अतुल अग्नीहोत्रीनेच सोशल मीडियावर शेअर केले.

View this post on Instagram

#SalmanKhan at #Ahilsharma 's Birthday Party 💕 Last Night 😻🎂 #HappyBirthdayAhil ❤ . . 😘@beingsalmankhan 👑😍😘❤😍😍😍 @salman_khan_fan96 ⬅ ❤ . . . . . . . . . . . . . 😻🍫 #SalmanKhan #beingsalmankhan #salmankhankingofbollywood #salmankhanmegastar #salmankhanhandsome #salmankhanswag #salmankhanstyle #salmankhanmyworld #salmankhanhero #salmankhankingdom #salmankhanno1worldwide #salmankhanlovers #beingsalmankhanfans #salmaniacs #Beinghuman #salmankhanfilms @skfilmsofficial @bharat_thefilm #BHARAT #bharateid2019 #Race3 #biggboss12 #happybirthday #jacquelinef143 #katrinakaif #bollywood . . . . . . . . . . . . . . 😍😍💋 . . . . . . . . . . . . . . . . . . . ❤❤ . . . . . . . . . . . . . . . . . . . 💚💚 . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 😻🍫😻🍫😻🍫😻🍫😻🍫😻🍫😻🍫😻🍫

A post shared by FAN ACCOUNT (@salman_khan_fan96) on

सलमानच्या 'भारत'चा सेट फार दूर असल्यामुळे सलमान या पार्टीत हजर राहणार नाही असं म्हटलं जातं होतं. पण अगदी शेवटच्या क्षणी आपलं शूटिंग थांबवून सलमान अख्या टीमसोबत पनवेलला पार्टी सेलिब्रेट करायला पोहोचला. आहिलचा बर्थडे केकही फार खास होता. यावर मुलांचे आवडते अनेक सुपरहिरोही होते. पार्टीची थीम ही मुलांना आवडणारी एवेंजर्स थीम होती.

मलायका - अर्जुनच्या नात्यावर काय म्हणाला अरबाज?

First published: March 31, 2019, 9:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading